---Advertisement---

युवा रिचा घोषचा न्यूझीलंडविरुद्ध झंझावात! तुफानी अर्धशतकासह मोडला १४ वर्ष जुना विक्रम

On: मंगळवार, फेब्रुवारी 22, 2022 3:12 PM
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यीत पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील भारताचे प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. असे असले तरी, काही भारतीय महिला खेळाडूंचे प्रदर्शन मात्र खूपच अप्रतिम राहिले आहे. मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताची १८ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष (richa ghosh) हिने तुफानी खेळी केली आणि १४ वर्षांपूर्वीचा भारतीय विक्रम मोडला.

उभय संघातील चौथा एकदिवसीय सामना मंगळवारी (२२ फेब्रुवारी) खेळला गेला. रिचा घोषने या सामन्यात अवघ्या २९ चेंडूत ५२ धावा केल्या. सामन्यात पावसामुळे अडथळा आला होता. त्यामुळे भारताला २० षटकांमध्ये १९२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. रिचा घोषने अर्धशतकी खेळी केली असली, तरी इतर खेळाडू मात्र अपेक्षित प्रदर्शन करू शकल्या नाहीत आणि भारतीय संघ पराभूत झाला. भारताने १७.५ षटकांमध्ये १२८ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. ऋचा घोषने अवघ्या २६ धावांमध्ये स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---