पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. एवढेच नाही तर टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतही क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. त्यानंतर तो पुढील सामन्यात सहभागी होणार की नाही? यावर प्रश्न निर्माण झाला होता.
मात्र, दुसऱ्या सामन्यापूर्वी त्याच्या दुखापतीबाबत चांगली बातमी समोर येत आहे. दरम्यान हेड कोच गौतम गंभीरने सांगितले आहे की तो पूर्णपणे तंदुरुस्त असून दुसऱ्या कसोटी सामन्यात सहभागी होण्यासाठी तयार आहे. एवढेच नाही तर पुढील सामन्यात विकेटकीपिंगची जबाबदारीही पंत सांभाळणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात रिषभ पंतला दुखापत झाल्यानंतर ध्रुव जुरेलने यष्टिरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी तो गुड टचमध्येही दिसला. मात्र, पंतची मैदानात उपस्थिती संघाला एक वेगळाच आत्मविश्वास देते. अशा परिस्थितीत संघ मालिकेत 1-0 ने पिछाडीवर असताना मैदानात त्याचा प्रवेश अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळवला जाणार आहे. स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर या रोमांचक सामन्याचा आनंद घेऊ शकतात. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर पाहता येणार आहे.
कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुyमन गिल, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव. , वॉशिंग्टन सुंदर आणि आकाश दीप.
न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मायकेल ब्रेसवेल, विल यंग, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, टिम साऊदी, मॅट हेन्री, जेकब डफी, एजाज पटेल आणि विल्यम ओ रुर्की
हेही वाचा-
मेगा लिलावापूर्वी मोठा गेम होणार! दिल्ली कॅपिटल्स पंतला रिलिज करण्याची शक्यता, हे दोन संघ रिषभच्या मागे
न्यूझीलंडच्या फलंदाजाने रचला इतिहास, झळकावले सर्वात जलद द्विशतक
केएल राहुलच्या भविष्यावर टीम मॅनेजमेंटने निर्णय घेतला! गौतम गंभीरनं स्पष्टच सांगितलं