---Advertisement---

न्यूझीलंडच्या फलंदाजाने रचला इतिहास, झळकावले सर्वात जलद द्विशतक

On: बुधवार, ऑक्टोबर 23, 2024 12:34 PM
---Advertisement---

न्यूझीलंडच्या चाड जेसन बोवेसने फोर्ट ट्रॉफी वनडे स्पर्धेतील सहाव्या सामन्यात इतिहास रचला आहे. चाडने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावून विश्वविक्रम केला. कँटरबरीचा फलंदाज चाड बोवेसने ओटागोविरुद्ध फलंदाजी करताना या सामन्यात शानदार खेळी खेळली. ज्यामध्ये द्विशतक झळकावून त्याने ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आणि भारताचा नारायण जगदीसन यांचा विक्रम मोडीत काढला.

काल म्हणजेच (22 ऑक्टोबर) रोजी, न्यूझीलंडचा फलंदाज चाड बोवेस याने लिस्ट ‘ए’ वन-डे क्रिकेटमध्ये आतापर्यंतचे सर्वात जलद द्विशतक ठोकले. कँटरबरी किंग्जचा सलामीवीर चाडने ओटागो व्होल्ट्सविरुद्ध हॅगले ओव्हलवर केवळ 103 चेंडूत 200 धावा केल्या आणि 11 चेंडूंनी मागील विक्रम मोडला.

चाड बोवेसने ऑस्ट्रेलियन आणि सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचा विक्रम मोडला. याआधी, ट्रॅव्हिस हेडने दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना 114 चेंडूत लिस्ट ए मध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावले होते. तर तामिळनाडूचा सलामीवीर नारायण जगदीसनने 2022 च्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात अरुणाचल प्रदेश विरुद्ध 114 चेंडूत 200 धावा केल्या होत्या.

चाड बोवेसने या सामन्यात 110 चेंडूंचा सामना करत 27 चौकार आणि 7 षटकारांसह 205 धावा केल्या. त्याच्या द्विशतकाच्या जोरावर संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. या सामन्यात चॅड बोवेस व्यतिरिक्त जॅचरी फॉल्केसने 49 धावांची खेळी केली. त्यामुळे कँटरबरी संघाने निर्धारित 50 षटकात 343 धावा केल्या.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Cricbuzz (@cricbuzzofficial)

सर्वात वेगवान लिस्ट-ए द्विशतक करणारा फलंदाज

चॅड बोवेस – 103 चेंडू

ट्रॅव्हिस हेड- 114 चेंडू

एन जगदीसन – 114 चेंडू

चाड बोवेसच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत न्यूझीलंडसाठी 6 एकदिवसीय आणि 11 टी20 सामने खेळले आहेत. तसेच फोर्ड ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावणारा तो इतिहासातील दुसरा खेळाडू ठरला. माजी ब्लॅक कॅप्स फलंदाज जेमी हाऊ (2012-13 हंगामात 222) असे करणारा एकमेव खेळाडू आहे.

हेही वाचा-

केएल राहुलच्या भविष्यावर टीम मॅनेजमेंटने निर्णय घेतला! गौतम गंभीरनं स्पष्टच सांगितलं
लखनऊच्या मॅनेजमेंटने कर्णधार केएल राहुलचा केला पत्ता कट, कारण ऐकून व्हाल थक्क..!
केएल राहुलच्या भविष्यावर टीम मॅनेजमेंटने निर्णय घेतला! गौतम गंभीरनं स्पष्टच सांगितलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---