रिषभ पंत टीम इंडियासाठी फलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पंत दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता. रिषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. ज्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली त्याच गुडघ्यात ही दुखापत झाली. मात्र तो आता सामन्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतो. कारण पंत टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पॅड घालून बसलेला दिसला. ज्याचा अर्थ असा की तो फीट आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने 3 गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. यादरम्यान विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि सर्फराज खान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार होता. मात्र कोहली बाद झाल्यानंतर सामना (दिवसाचा खेळ) घोषित करण्यात आला. त्यामुळे पंत फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकला नाही. मात्र तो चौथ्या दिवशी फलंदाजीला येईल. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावापूर्वी ब्रेक दरम्यान त्याने सरावही केला. पंतला फलंदाजीत कोणतीही अडचण नाही. अशी माहिती देखील समोर आली आहे.
बंगळुरू कसोटीत टीम इंडियाने शानदार पुनरागमन केले आहे. पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाली. मात्र दुसऱ्या डावात 3 गडी गमावून 231 धावा केल्या. विराटने 102 चेंडूंचा सामना करत 70 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये कोहलीने 8 चौकार आणि 1 षटकार मारला. सर्फराज खान 70 धावा करून नाबाद आहे. त्याने 78 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले. कर्णधार रोहित शर्माने देखील अर्धशतक झळकावले. त्याने 52 धावांची खेळी खेळली. डावखुऱ्या यशस्वी जयस्वालने देखील 35 धावा केल्या.
हेही वाचा-
ind vs nz; भारताचा पलटवार, रोहित-विराटसह, सर्फराजची शानदार खेळी, असा राहिला तिसरा दिवस
कोहलीची ‘विराट’ कामगिरी, सचिन-द्रविड आणि गावस्कर यांच्या खास क्लबमध्ये प्रवेश
IND vs NZ: दुर्दैवीचं म्हणावं..! रोहित शर्माची अनलकी विकेट; पाहा VIDEO