हॅमिल्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज (31 जानेवारी) पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्स आणि 212 चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला आहे.
या सामन्यातून भारताचा युवाखेळाडू शुबमन गिलने वरिष्ठ वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने यावेळी जरी 9 धावा केल्या असल्या तरी त्याने भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे.
या सामन्यात गिल हा शिखर धवन बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्यामुळे तो वनडे पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या तीन क्रमांकामध्ये(वरच्या फळीत) फलंदाजीसाठी येणारा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने आज त्याचे वय 19वर्ष 145 दिवस एवढे असताना हे वनडे पदार्पण केले आहे.
याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. 2008मध्ये पदार्पण करणाऱ्या विराटने 19वर्ष 287 दिवस वयाचा असताना भारताकडून गौतम गंभीर सोबत सलामीला फलंदाजी केली होती. त्यावेळी त्याने 22 धावा केल्या होत्या.
आज भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीकडून शुबमनला वन-डेची कॅप देण्यात आली. तो भारताचा 227वा वन-डे खेळाडू ठरला आहे. त्याने आयसीसीच्या 19वर्षाखालील विश्वचषक 2018मध्ये उत्तम कामगिरी करत मॅन ऑफ दी टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता.
भारताकडून वन-डे पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या तीन क्रमांकामध्ये(वरच्या फळीत) फलंदाजी करणारे सर्वात तरुण खेळाडू-
19वर्ष, 145 दिवस – शुबमन गिल (2019, न्यूझीलंड विरुद्ध 9 धावा, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी)
19वर्ष, 287 दिवस – विराट कोहली (2008, श्रीलंका विरुद्ध 22 धावा, सलामी)
19 वर्ष, 321 दिवस – दिलीप वेंगसकर (1976, न्यूझीलंड विरुद्ध 16 धावा, सलामी)
20वर्ष, 155 दिवस – रॉबिन उथप्पा ( 2006, इंग्लंड विरुद्ध 86 धावा, सलामी)
21वर्ष,179 दिवस – गौतम गंभीर (2003, बांगलादेश विरुद्ध 11 धावा, सलामी)
महत्त्वाच्या बातम्या-
–ट्रेंट बोल्ट प्रमाणेच न्यूझीलंडच्या या गोलंदाजांनी भारताला दिला आहे त्रास
–केएल राहुलचे विश्वचषकातील स्थान धोक्यात…?
–भारतीय संघाला ट्रोल करणे इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूला पडले भलतेच महागात