टीम इंडियाने 2025 वर्ष जोरात गाजवलं, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या वनडे मालिकेत विजय मिळवून वर्षाचा गोड शेवट केला. आता 2026 मध्ये भारतीय संघाची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. मालिकेत 3 एकदिवसीय आणि 5 टी 20 सामना आहेत, आणि वनडे मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांचा कमबॅक निश्चित झाला आहे. दोघांनाही दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळता आलेले नव्हते. शुबमन आणि रोहितची सलामी जोडी, विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि श्रेयस चौथ्या स्थानावर खेळण्यासाठी सज्ज आहे, ज्यामुळे टॉप-4 चं गणित सोपं झाले आहे.
गेल्या काही सामन्यांपासून विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतऐवजी केएल राहुलला संधी दिली जात आहे. केएल राहुल पाचव्या क्रमांकावर खेळेल, आणि पंतला पुन्हा बाहेर बसावं लागेल. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत ऑलराउंडर म्हणून रवींद्र जडेजा संघात खेळू शकतो, तर नितीश रेड्डी किंवा वॉशिंग्टन सुंदरपैकी एकालाही संधी मिळू शकते.
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज एकदिवसीय मालिकेसाठी संघात परत आला आहे, त्यामुळे त्याला खेळण्याची संधी अधिक आहे. त्याला अर्शदीप सिंग किंवा प्रसिद्ध कृष्णा यापैकी जोडी मिळेल, तर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी कुलदीप यादवकडे असेल.
टीम इंडियाचा संतुलित संघ, अनुभवी कर्णधारांचा कमबॅक आणि तगडा गोलंदाजी विभाग या मालिकेत न्यूझीलंडसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. भारतीय चाहत्यांची नजर रोहित-कोहलीच्या अनुभवी जोडीवर आणि संघाच्या कामगिरीवर असेल.






