शुबमन गिल नुकताच न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरू कसोटी सामना न खेळल्यामुळे चर्चेत आला होता. आता दुसरा भारत-न्यूझीलंड सामना उद्या म्हणजेच 24 ऑक्टोबरपासून पुण्यात खेळवला जाणार आहे. ज्यामध्ये गिलचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. याआधी शुबमन गिलने सोशल मीडियावर आपल्या फोटोंनी खळबळ उडवून दिली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या छायाचित्रांमध्ये तो लूक आणि हॉटनेसच्या बाबतीत बॉलिवूड कलाकारांना टक्कर देत आहे.
शुबमन गिलच्या या हॉट फोटोशूटचे फोटो व्हायरल होत आहेत. त्याचा पांढरा पोशाख कहर करत आहे. त्याचे हेअर स्टाईल देखील पारंपारिक फॅशन सेन्सची झलक देत आहे. वास्तविक, शुबमन गिलने हे फोटोशूट अमेरिकन कंपनी असलेल्या ‘अमिरी’ या कपड्यांच्या ब्रँडसाठी केले आहे.
View this post on Instagram
एकीकडे, टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकांपैकी एक रायन टेन ड्यूश यांनी शुबमन गिलचे दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केल्याची पुष्टी केली आहे. पण त्यामुळे त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमधून कोणता खेळाडू बाहेर राहणार, हाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्फराज खानने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 150 धावांचे शतक झळकावले.
सर्फराजने शतक झळकावून दुसरी कसोटी खेळण्याचा दावा केला आहे. जर गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आणि सर्फराज पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल. अशा स्थितीत पुण्याची खेळपट्टी पाहता केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. कारण टीम इंडिया अतिरिक्त फिरकी गोलंदाज घेऊन मैदानात उतरू शकते.
हेही वाचा-
या अनुभवी फलंदाजाने रचला इतिहास; बांग्लादेशसाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच
IND VS AUS; BGT मालिकेसाठी या अष्टपैलू खेळाडूला मिळणार स्थान
“बबिताला बृजभूषण सिंगचे पद मिळवण्याची लालूच होती, म्हणून…”, साक्षी मलिकचा धक्कादायक दावा