क्रिकेट विश्वात सध्या लग्नसराई चालू आहे. भारतीय क्रिकेट संघातील केएल राहुल पाठोपाठ अक्षरनेही लग्नगाठ बांधली. त्यानंतर आणखी एका क्रिकेटरच्या घरीही सनई चौघडे वाजले. सध्या न्युझीलंड विरुध्द टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेत खेळत असलेला भारताचा प्रमुख क्रिकेटपटू कुलदीप यादव यांच्या घरी ही लगीनघाई झाली. रांची येथील पहिल्या सामन्यानंतर कुलदीप घरी परतला होता झाला. जेथे त्याने आपल्या बहिणीच्या लग्नात हजेरी लावली.
कुलदीप हा त्याची बहीण अनुष्काच्या लग्नासाठी (Anushka wedding) घरी गेला. त्याने याप्रसंगीचे फोटो त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघा भाऊ-बहीणींचे प्रेम आणि नाते दिसून आले.
कुलदीपने बहीण अनुष्कासोबत एक फोटो शेअर करत लिहीले की, “माझ्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी मी तिच्या सोबत उभा असताना, मी खूप भावुक झालो आहे. बहिणीच्या लग्नाचा आनंदही तर आहेच, परंतु ती सासरी चालल्याचे दु:खही होत आहे. मात्र, तुझ्यासाठी मी खुप खुश आहे. कारण तु तुझ्या आयुष्यातील एक नवीन सुरूवात करणार आहे. आपल्या सर्व आठवणींसाठी आणि अजून बाकी असलेल्या सर्व आठवणींसाठी मी कृतज्ञ आहे. लाडक्या बहिणीचे खुप खुप अभिनंदन. मी नेहमीच तुझ्यासोबत असेल. माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे.”
https://www.instagram.com/p/Cn92EnLq5UU/?utm_source=ig_web_copy_link
अनेक सहकारी खेळाडूंनीही कुलदीपच्या बहिणीच्या लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. यात युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal), उमरान मलिक (Umran Malik) यांच्याशिवाय अनेक खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघात परतल्यापासून कुलदीप यादव जबरदस्त कामगिरी करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने 6 विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर श्रीलंकेविरुद्धच्या वनडेतही त्याने शानदार गोलंदाजी केली होती. दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 5 विकेट घेतल्या.
(kuldeep yadav attended sister anushka wedding share emotional post on social media)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’सारखीच आहे ‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजाची लव्हस्टोरी, प्रेमासाठी थेट…
‘शोले- 2 चा दुसरा भाग लवकरच येतोय’…क्रिकेटमधील जय वीरुची मोठी घोषणा