---Advertisement---

वनडेनंतर टी20 मध्येही टीम इंडियाची अग्निपरिक्षा! सूर्याचा संघ यातून वाचेल?

On: मंगळवार, जानेवारी 20, 2026 5:49 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२६ची पूर्वतयारी म्हणून अनेक संघ सध्या टी२० मालिका खेळत आहेत. अशातच भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. यामध्ये भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. मागील काही मालिकांपासून सूर्यकुमारच्या नेतृत्वात एक वेगळाच भारतीय संघ पाहायला मिळाला आहे. संघाने अनेक सामने जिंकत मालिकाही आपल्या नावे केल्या आहेत. असे असले तरीही न्यूझीलंडही फॉर्ममध्ये आहे.

सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने २५ पैकी १८ सामने जिंकले आहेत. या विजयांमध्ये स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा आणि फिरकीपटू वरूण चक्रवर्ती यांनी उत्तम कामगिरी केली होती. न्यूझीलंडही या प्रकारच्या क्रिकेटमध्ये मागे नाही. त्यांनी २०२४च्या विश्वचषकानंतर २१ पैकी १३ सामने जिंकले आहेत.

आयपीएलमुळे भारताला अनेक खेळाडू मिळाले असून त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या योग्यपणे पार पाडल्या आहेत. आगामी विश्वचषक भारतातच होत असल्याने भारताला न्यूझीलंडच्या मालिकेत पूर्णपणे यशस्वी व्हावे लागणार आहे. यासाठी सर्वच विभागांमध्ये उत्तम कामगिरी करावी लागणार आहे.

सध्या भारतीय संघातील अभिशेक संघाला फलंदाजीवेळी चांगली सुरूवात करून देतो, मात्र सूर्यकुमारचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. त्याने मागील १९ सामन्यांत केवळ २१८ धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने एकही अर्धशतक मारले नाही. त्याचा हा फॉर्म संघासाठी अडचण ठरू शकतो. तिलक वर्माला फलंदाजीसाठी अधिक संधी मिळावी यामुळे त्याने स्वत:ला चौथ्या क्रमांकावर ठेवले.

तसेच संघात श्रेयस अय्यर परतला आहे. त्याने तीन वेगवेगळ्या आयपीएल संघांना अंतिम सामन्यांत पोहोचवले असून एकाला विजेतेपदही जिंकवून दिले आहे. त्याचबरोबर या मालिकेतून भारताच्या संघात हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह ब्रेकनंतर परतत आहेत. न्यूझीलंडला चक्रवर्ती विरुद्ध अधिक अनुभव नाही. ही भारतासाठी जमेची बाजू असताना कुलदीप यादवची लय मात्र बिघडली आहे.

न्यूझीलंडलाही कमी लेखून चालणार नाही. त्यांनी भारताविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी भारतात भारताविरुद्ध अजूून एकदाही टी२० मालिका जिंकलेली नाही, मात्र पहिल्यांदाच भारतात वनडे मालिका जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यातच आक्रमक फलंदाज डेवॉन कॉनवे, कर्णधार मिचेल सॅंटनर, स्फोटक फलंदाज डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध विजय हवा तितका सोपा नाही.

या मालिकेतील पहिला सामना २१ जानेवारीला नागपूर येथे खेळला जाणार आहे.

टी२० मालिकेसाठी संघ-

भारत – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंह, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई, हर्षित राणा.

न्यूजीलंड – मिचेल सॅंटनर (कर्णधार), डेवोन कॉनवे, बेवन जैकब्स, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टिम रॉबिन्सन, जिमी नीशम, ईश सोढ़ी, जैक फाउल्स, मार्क चॅपमन, माइकल ब्रेसवेल, रचिन रविंद्र, काइल जॅमीसन, मॅट हेन्री, जॅकब डफी, क्रिस्टियन क्लार्क.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---