भारतीय संघ टी-20 विश्वचषकात मिळालेल्या पराभवानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. विश्वचषकातील उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताला 10 विकेट्सच्या अंतराने पारभूत केले आणि पुढे जाऊन विश्वचषक देखील जिंकला. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पंड्या भारताचे नेतृत्व करत आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द केला गेला, पण दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांचा मोठा विजय मिळवला. न्यूझीलंडविरुद्ध मागच्या 10 टी-20 सामन्यांमध्ये भारताची आकडेवारी लक्षणीय राहिली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यीत खेळल्या गेलेल्या मागच्या 10 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे पारडे जड राहिले आहे. भारताला या 10 सामन्यांपैकी 9 सामने जिंकले आहेत, तर दुसरीकडे न्यूझीलंडला फक्त एक विजय मिळाला. विशेष म्हणजे भारताने जिंकलेले 9 सामने हे द्विपक्षीय मालिकेत जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने जिंकलेला एक सामना टी-20 विश्वचषकात मागच्या वर्षी जिंकला. भारताने जिंकलेल्या ९ सामन्यांपैकी तीन सामने त्यांनी मायदेशात खेळले, तर सहा सामने विदेशात जिंकले.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने विश्वचषकात भारताचे नेतृत्व केले आणि संघाला उपांत्य सामन्यापर्यंत घेऊन गेला. विश्वचषकानंतर भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात मात्र रोहितसह विराट कोहली, केएल राहुल आणि इतकर काही वरिष्ठ खेळाडू विश्रांतीवर आहे. अशात हार्दिक पंड्या (hardik Pandya) या टी-20 मालिकेत संघाचे नेतृत्व करत आहे. न्यूझीलंडला रविवारी (20 नोव्हेंबर) पराभूत केल्यानंतकर हार्दिकच्या नावावर देखील खास कामगिरी नोंदबली गेली. हार्दिक संघाचा कर्णधार म्हणून खेळलेल्या मागच्या सलग चार टी-20 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे.
दरम्यान, रविवारी माऊंट माँगनुई याठिकाणी खेळल्या गेलेल्या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. मर्यादित 20 षटकांमध्ये भारतीय फलंदाजांनी 6 विकेट्सच्या नुकसानावर 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे फलंदाज मात्र अवघ्या 126 धावा करून सर्वबाद झाले. कर्णधार केन विलियम्सन याने न्यूझीलंडसाठी सर्वाधिक 61 धावा केल्या. तर दुसरीकडे भारताचा मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव याने सामन्यात सर्वाधिक 111 धावांची खेळी केली. सूर्याने या धावा करण्यासाठी अवघे 51 चेंडू खेळले आणि शेवटपर्यंत नाबाद देखील राहिला. विजयानंतर या वादळी खेळीसाठी सूर्यकुमारला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भुवी आणि पहिल्या ओव्हरच नातचं खास! विरोधी फलंदाजाची शिकार करणार म्हणजे करणारच
भारताच्या क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदा घडली ‘ही’ विलक्षण घटना, सलामीला पहिल्यांदाच..