अंडर19 विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ब गटात असलेल्या भारतीय संघाने आपले पहिले दोन्ही सामने जिंकून सुपर सिक्समध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आज गट फेरीतील शेवटच्या सामन्यात त्यांचा सामना न्यूझीलंड अंडर19 संघाशी होईल. हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात, टीम इंडिया जिंकून गट टप्प्यात अव्वल स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.
मोहम्मद एनानने 25व्या षटकातील दुसऱ्या चेंडूत जेबक कॉटरला झेलबाद करत संघाला सातवी विकेट मिळवून दिली. यासह 25 षटकांत 7 बाद 72 धावा केल्या आहेत. कनिष्क चौहानने पाचव्या चेंडूवर जसकरन संधूला झेलबाद करत संघाला सहावी विकेट मिळवून दिली.
अंबरीशने न्यूझीलंडच्या मार्को आल्पेला क्लीन बोल्ड करत भारताला चौथी विकेट मिळवून दिली. तर अंबरीशने या सामन्यातील त्याची तिसरी विकेट मिळवली आहे. तर पुढच्याच षटकात खिलान पटेलच्या गोलंदाजीवर अभिज्ञान कुंडूने कमालीच्या चपळाईने स्टंपिंग करत स्नेहहित रेड्डीला माघारी धाडलं. यासह 10 षटकांत न्यूझीलंडचा संघ 5 विकेट्स गमावत 22 धावा करू शकला आहे.
अंडर19 वर्ल्डकपमधील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 4 वाजता सुरू होणार आहे आणि बराच काळ सामन्यात व्यत्यय आल्याने आता हा सामना 37 षटकांचा होणार आहे. हेनिल पटेलने आठव्या षटकातील पहिल्या चेंडूवर आर्यन मानला पायचीत केलं आणि संघाला तिसरी विकेट मिळवून दिली. यादरम्यान जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे सामना थांबवण्यात आला.
पाचव्या षटकात अंबरीशने कर्णधार टॉम जोन्सला झेलबाद केलं आहे. आयुष म्हात्रेने कमालीचा झेल टिपला आहे. यासह 5 षटकांत 2 बाद 9 धावा केल्या आहेत. तिसऱ्या षटकात एस अंबरीशने न्यूझीलंडचा सलामीवीर हुय्गो बोगला झेलबाद केलं. विकेटच्या मागे अभिज्ञान कुंडूने चांगला झेल टिपला.






