---Advertisement---

…म्हणून भारतीय फलंदाजी गडगडली, मयंक अगरवालचा खूलासा

On: शनिवार, फेब्रुवारी 22, 2020 6:11 PM
---Advertisement---

शुक्रवारपासून (21 फेब्रुवारी) बेसिन रिझर्व येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (1st Test Match) सुरु झाला. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने 5 बाद 122 धावा केल्या होत्या. तर आज दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव केवळ 165 धावांवरच संपुष्टात आला.

या सामन्यात पहिल्याच दिवशी भारताचे मुख्य फलंदाज बाद होऊन ड्रेसिंग रुममध्ये परतले होते. याबद्दल पहिलया दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने (Mayank Agarwal) बेसिन रिझर्वच्या कठीण खेळपट्टीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना मयंक म्हणाला की, बेसिन रिझर्वच्या खेळपट्टीवर खेळणे खूपच कठीण आहे. तसेच येथे आपला पहिला कसोटी सामना खेळत असलेला न्यूझीलंडचा गोलंदाज काईल जेमीसनच्या गोलंदाजीने भारतीय संघाच्या फलंदाजांच्या समस्यादेखील वाढविल्या आहेत.

“येथे वारा खूप वेगाने वाहत असतो. तेव्हा तुम्हाला मैदानावर स्थिर व्हावे लागते. एक फलंदाज म्हणून विशेषत: सामन्याच्या पहिल्याच दिवशी हे कठीण आहे,” असेही मयंक म्हणाला.

“एका फलंदाजाला असे कधीच वाटत नाही की आपण आता स्थिर झालो आहे. कारण लंचब्रेकनंतरही मैदानावरील समस्या वाढत होत्या,” असे वातावरणाबद्दल बोलताना मयंक म्हणाला.

यावेळी काईल जेमिसनची (Kyle Jamieson) प्रशंसा करताना मयंक म्हणाला की, “जेमिसनने चांगली आणि योग्य दिशेने गोलंदाजी केली. त्याने नवीन चेंडूचा चांगला वापर केला आणि आम्हाला त्रास देत राहिला.”

“खेळपट्टीवर ओलावा असल्यामुळे त्याला मदत मिळत होती. त्यामुळे फलंदाजांना उसळी घेणाऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागत होते,” असे मंयक यावेळी म्हणाला.

“तुम्ही एका षटकातील सहा चेंडूंवर आक्रमक होऊ शकत नाही. 3-4 चेंडू जरी चांगले पडले तेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही फलंदाजांना बाद करू शकता. तसेच हाच विचार करून तुम्ही आक्रमक होता,” असेही गोलंदाजांबद्दल बोलताना मयंक म्हणाला.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---