पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमधील बहुप्रतिक्षित ‘भालाफेक’ स्पर्धेमध्ये भारताच्या नीरज चोप्रावर मात केली. अर्शदने 92.97 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. नीरजने 89.45 मीटर थ्रो करून भारताला रौप्यपदक मिळवून दिले. या स्पर्धेचे कांस्यपदक ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 88.54 मीटर भालाफेक करून जिंकले. पण या सगळ्यात एक गोष्ट घडली की, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने जिंकलेल्या 5 पदकांपेक्षा पाकिस्तानच्या एका सुवर्णपदकाने बाजी मारली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गुरुवारी (08 ऑगस्ट) रोजी भालाफेक करण्यासाठी खेळाडू रात्री 11.45 वाजता मैदानात उतरले होते. त्यासोबत 140 कोटी भारतीयवासी नीरज चाैप्राकडून सुवर्ण पदकाची आशा करत होते. परंतु पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमने नीरजला चितपट केले. अर्शदने ऑलिम्पिकमध्ये सर्वात मोठे थ्रो करून पाकिस्तानला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने 92.97 मीटर अंतरावर भालाभेक मारले. यातच भारताला धक्का बसला.
अशाप्रकारे, एक सुवर्णपदक जिंकून पाकिस्तान पदकतालिकेत (9 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत) 53 व्या स्थानावर आहे. तर भारत 11 स्थानांनी खाली 64 व्या क्रमांकावर आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने नीरजच्या 1 रौप्यसह 4 कांस्यपदके जिंकली आहेत. भारताला हॉकीमध्ये एक कांस्यपदक मिळाले आहे, तर 3 पदके नेमबाजीत आली आहेत.
म्हणजेच पाकिस्तानचे सुवर्णपदक भारताच्या तुलनेत जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाकिस्तान पदकतालिकेत भारताच्या वर पोहोचला आहे. अर्शद नदीमने पदक जिंकून भारताला दुहेरी धक्का दिला, कारण नीरज चोप्रा भारताला सुवर्णपदक मिळवून देईल अशी अपेक्षा होती.
अर्शदचे हे पदक 1992 च्या ऑलिम्पिकनंतरही पाकिस्तानचे पहिले पदक होते. जेव्हा पाकिस्तानच्या हॉकी संघाने बार्सिलोनामध्ये कांस्यपदक जिंकले होते. म्हणजे एकूण 32 वर्षांचा दुष्काळ अर्शदने संपवला. अर्शद नदीम हा पाकिस्तानचा पहिला खेळाडू ठरला ज्याने वैयक्तिक स्पर्धेत आपल्या देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले.
हेही वाचा-
“खरचं खूप दु:ख…”, विनेश फोगटच्या अपात्रतेवर नीरज चोप्राची भावनिक प्रतिक्रिया
Paris Olympics: आज भारताच्या खात्यात येऊ शकते ‘सहावे’ पदक, जाणून घ्या दिवसभराचे वेळापत्रक
‘प्रत्येक खेळाडूचा दिवस…’, नीरज चोप्रा ‘सिल्व्हर’ जिंकल्याने दुःखी? पाहा पहिली प्रतिक्रिया आली समोर