भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामना असला की क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर एक वेगळेच वातावरण निर्माण होते. जेव्हा या दोन संघामध्ये सामना होतो तेव्हा खेळाडूंमध्ये उत्तम कामगिरी करण्याची चढाओढ सुरू असते. जुने सामने पाहिले तर आपल्यासमोर एक वेगळेच चित्र येते. मात्र आता दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांचा आदर करताना दिसतात. नुकतेच त्याचे उदाहरण दिसले आहे. आपल्या संग्रहात एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्जची (सीएसके) जर्सी असलेल्या हॅरीस रऊफला आणखी एका भारतीय खेळाडूची जर्सी मिळाली आहे.
एशिया कप (Asia Cup) 2022मध्ये रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानचा वेगवान गोलंदाजा हॅरीस रऊफ (Haris Rauf) याला भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने गिफ्ट दिले आहे. हॅरिसला विराटने टीम इंडियाच्या जर्सीवर ऑटोग्राफ दिला आहे. त्या दोघांचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंवर शेयर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘सामना जरी संपला असला तरी असे क्षण चमकत राहतील. विराट कोहलीने हृद्यस्पर्शी कृती करत पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रऊफला आपल्या जर्सीवर ऑटोग्राफ देत भेट म्हणून दिला आहे.’
The match may be over but moments like these shine bright ✨👌
A heartwarming gesture by @imVkohli as he hands over a signed jersey to Pakistan's Haris Rauf post the #INDvPAK game 👏👏#TeamIndia | #AsiaCup2022 pic.twitter.com/3qqejMKHjG
— BCCI (@BCCI) August 29, 2022
हॅरिसने विराटच्या आधी एमएस धोनी (MS Dhoni) याच्या सीएसकेच्या जर्सीवर ऑटोग्राफ घेतला होता. हॅरीसने त्याच्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवर धोनीच्या जर्सीबाबत पोस्टही शेयर केली होती.
View this post on Instagram
भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकला. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा या निर्णय योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी विरोधी संघाला 19.5 षटकात सर्वबाद करत 147 धावांवर रोखले. यावेळी भुवनेश्वर कुमार याने 4 आणि हार्दिक पंड्या याने 3 विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अडखळत झाली होती. केएल राहुलची विकेट लवकर पडल्यावर विराट डावाच्या तिसऱ्याच चेंडूवर फलंदाजी करण्यास आला. त्याने आणि रोहितने दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हार्दिक पंड्या-रविंद्र जडेजा जोडीने 52 धावांची भागीदारी केली. यावेळी हार्दिकने नाबाद 33 धावा केल्या. त्याने अष्टपैलू कामगिरी केल्याने तो सामनावीराचा मानकरी ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शास्त्री गुरुजींकडूनही झाले आवडत्या शिष्याचे कौतुक; म्हणाले, “भारताला त्याच्यासारखा…”
बुडत्याचा पाय खोलात! 35 धावांच्या खेळीनंतरही विराटला झालाय तोटा; टी20 कारकिर्दीत पहिल्यांदाच…
फिटनेसने नाहीतर पाकिस्तानने यामुळे गमावलायं सामना! दिग्गजांनी सांगितले खरे कारण