भारतीय संघाला रविवारी (२८ ऑगस्ट) आशिया चषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा सामना करायचा आहे. या सामन्याने भारत आशिया चषकातील त्याचा अभियानाची सुरुवात करेल. भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे. चाहेत्यांचा भारतीय संघाविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आहे. अशातच कर्णधार रोहित याचा एक खास व्हिडिओ समोर आला आहे, जो चाहत्यांना खूपच भावल्याच दिसते.
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यापूर्वी भारतीय संघात्या कॅम्पमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तनच्या (IND vs PAK) खेळाडूंमधील चर्चाही चाहत्यांना पाहायला मिळाली होती. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील चर्चेत राहिला. त्याने पाकिस्तानचा एका चाहता लोखंडी जाळीच्या पलिकडे असून देखील त्याला गळाभेट देण्याचा प्रयत्न केला होता. आता रोहितचा असाच एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा या व्हिडिओत चाहत्यांसोबत बोलताना दिसत आहे. चाहते रोहित येण्याच्या आधीपासून त्याच्या ऑटोग्राफसाठी वाट पाहताना दिसतात. रोहित आल्यानंतर त्यांना ऑटग्राफ देऊ लागतो. परंतु, तितक्यात एकजण त्याच्याकडे ऑटग्राफ केलेल्या जर्सीची मागणी करतो. रोहितला या चाहत्यामी मागणी पाहून जराही आश्चर्य वाटले नाही, हे व्हिडिओत स्पष्टपणे दिसते. रोहित त्या चाहत्याला म्हणतो, “देणार-देणार… नक्कीच.” त्यावर चाहता कधी? असा प्रश्न विचारतो. रोहित या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला की, “अरे आधी सिरीज तर संपू दे भाऊ.” अशा पद्धतीने रोहित चाहत्यांना ऑटोग्राफ देऊन पुढे निघून जातो.
Rohit Sharma promises a fan his signed t-shirt after winning the Final.pic.twitter.com/8FOvy1jc3n
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 27, 2022
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान संघ मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात शेवटच्या वेळी एकमेकांसोबत खेळले होते. आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासातात पाकिस्तानने मागच्या वर्षी पहिल्यांदाच भारताला पराभूत केले होते. भारतीय संघा आता यावर्षीय त्या पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल. चाहत्यांमध्ये या सामन्याविषयी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘पिक्चर अभी बाकी है!’ पहिला सामना जिंकल्यानंतर अफगाणिस्तानच्या कर्णधाराचे खास संकेत
एकही रुपया न भरता लाईव्ह पाहता येणार भारत-पाकिस्तान मॅच! फक्त कराव्या लागतील ‘या’ सोप्या गोष्टी
अल्टिमेट खो खो स्पर्धेत मुंबई खिलाडीज संघाची तेलगु योद्धाजवर मात