भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजेच चाहत्यांना जणू पर्वणीच ठरते, हा सामना केवळ खेळ नसून ती भारतीयांसाठी एक प्रकारची दिवाळीच आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, याची प्रचिती चॅम्पियन्स ट्राॅफीच्या सामन्यात पाहायला मिळली. या महामुकाबल्याला जिओस्टारवर तब्बल 17.7 कोटी लाईव्ह व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे तो क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, हा सामना 2 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 49.3 षटकांत 231 धावा केल्या. ज्यामध्ये सौद शकीलने ६२ धावा, तर कर्णधार मोहम्मद रिझवानने 46 धावा केल्या. तर भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवने 3/40, तर हार्दिक पांड्याने 2/31 अशी कामगिरी केली. तर लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने हे आव्हान सहज पूर्ण केले. ज्यात विराट कोहलीने 100* शतक, श्रेयस अय्यरने 56 धावा, तर शुबमन गिलने 46 धावा करत भारताचा विजय निश्चित केला. भारताने 42.3 षटकांत 6 विकेट्सने सामना जिंकला.
या सामन्याला जिओस्टारवर तब्बल 17.7 कोटी लाईव्ह व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे तो क्रिकेट इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला. 2023 च्या विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याचा हा विक्रम मोडला गेला. मात्र, जिओस्टारच्या अहवालात -षटकांच्या विश्वचषक नॉकआउट सामन्यांचा समावेश नाही.
दरम्यान, यजमान पाकिस्तानसाठी स्पर्धा निराशाजनक ठरली. लीग टप्प्यातील सर्व सामने गमावल्यानंतर ते स्पर्धेबाहेर झाले. त्यामुळे पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.
(Champions Trophy 2025 Final) यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबईच्या मैदानावर सामना रंगणार आहे. सेमीफायनल सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियास नमवून फायनलमध्ये एंट्री केली तर दुसरीकडे किवी संघाने आफ्रिकेला उपांत्य फेरीत सहज पराभव केले. दरम्यान आता स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी म्हणजेच 9 मार्च रोजी होणार आहे. या सामन्यावर जगभरातून क्रिकेट चाहत्यांचा कल लागला आहे.
हेही वाचा-
भारताचा शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल सामना कोणाविरुद्ध? जाणून घ्या निकाल
IND vs NZ; चॅम्पियन्स बनण्याचं स्वप्न भंगणार! अंतिम सामन्यातून संघाचा हुकमी एक्काच बाहेर
मोहम्मद शमी ठरणार गोल्डन बाॅलचा मानकरी! फायनलमध्ये घेतल्या पाहिजेत महत्त्वाच्या विकेट्स