यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफीतील सर्वात हाय व्होलटेज सामना आज रंगत आहे. हा सामना दुसऱ्या कोणात नसून भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या महा मुकाबल्यात पाकिस्तान कर्णधार मोहम्मद रिझवानने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय संघ पहिल्या डावात गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगला जात आहे.
दोन्ही संघाबद्दल बोलायचे झाल्यास पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा 6 गड्यांनी पराभव केला, तर दुसरीकडे पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान आता पाकिस्तानला आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. तत्पूर्वी दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन पाहुयात.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
पाकिस्तान- इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिजवान (कर्णधार), सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद
PAKISTAN HAVE WON THE TOSS AND THEY’VE DECIDED TO BAT FIRST. pic.twitter.com/MhVwL310EU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 23, 2025
हेही वाचा-
दुबईत नाणेफेक म्हणजे अर्धी लढाई जिंकली! IND vs PAK सामन्यापूर्वी महत्त्वाची आकडेवारी समोर
IND vs PAK: क्रिकेट भक्ती.! भारताच्या विजयासाठी देशभरात होमहवन-पूजाअर्चा
Masters League; वयाच्या 43 व्या वर्षी युवराज सिंगने घेतला सुपरमॅन कॅच, पाहा VIDEO






