नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघात महामुकाबला सुरू आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 12व्या सामन्यात पाकिस्तान संघाला फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. यावेळी कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितने जसा गोलंदाजीचा निर्णय घेतला, तसा त्याच्या नावावर वनडे विश्वचषकात खास विक्रमाची नोंद झाली. त्याने भारताकडून पाकिस्तानविरुद्ध नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांपासून स्वत:ला वेगळे सिद्ध केले.
रोहित शर्माचा विक्रम
खरं तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) हा असा पहिलाच भारतीय कर्णधार बनला, ज्याने वनडे विश्वचषक इतिहासात पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. यापूर्वी जेव्हाही कोणत्या भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकली, तेव्हा त्याने प्रथम फलंदाजीचाच निर्णय घेतला होता. मात्र, रोहितने आता स्वत:ला याबाबतीत वेगळे सिद्ध केले.
नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याच्या निर्णयाविषयी भारतीय कर्णधार म्हणाला की, “खेळपट्टी खूपच चांगली आहे आणि जास्त बदल पाहायला मिळणार नाही. रात्री दव मोठी भूमिका बजावू शकतात, त्यामुळे आम्ही गोलंदाजीचा निर्णय घेतला.”
भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम
अहमदाबाद येथे होत असलेल्या सामन्यापूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आतापर्यंत विश्वचषकातील 7 सामने खेळले गेले आहेत. त्यात 5 वेळा भारतीय कर्णधारांनी नाणेफेक जिंकली आहे. त्यात 1992, 1996 आणि 1999 विश्वचषकात मोहम्मद अझरुद्दीन याने नेतृत्व केले होते. त्याने तिन्ही सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली होती. तसेच, 2011 आणि 2015 विश्वचषकात एमएस धोनी यानेही असेच केले होते.
आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, अहमदाबादमध्ये रोहित आपल्या या अनोख्या निर्णयाने भारताचा विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्ध सर्व सामने जिंकण्याचा विक्रम कायम ठेवू शकतो की नाही. (ind vs pak cwc 2023 hitman rohit sharma becomes 1st indian captain to decide bowl first against pakistan in odi world cup history)
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघांची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
हेही वाचा-
अर्रर्र…मोठी चूक! INDvsPAK सामन्यात विराटने घातली भलतीच जर्सी, फोटो जोरदार व्हायरल
न्यूझीलंडसाठी बॅड न्यूज! विलियम्सनला पुन्हा फ्रॅक्चर, बॅकअप म्हणून आला तगडा खेळाडू