एशिया कप (Asia Cup) २०२२च्या हंगामाची सुरूवात येत्या शनिवारी (२७ ऑगस्ट) होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध आहे. हा सामना दुबई येथे खेळला जाणार आहे. या अतिमहत्वाच्या सामन्यासाठी भारताच्या खेळाडूंनी नेटमध्ये चांगलाच घाम गाळला आहे. दीपक चाहरच्या गोलंदाजीवर रिषभ पंतने फलंदाजी केली, तर वीवीएस लक्ष्मण यांनी पंचाची भुमिका पार पाडली. अशावेळी पंचाच्या एका निर्णयावर गोलंदाजाने नाराजी दर्शवली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामन्याला आता काहीच वेळ उरला असताना खेळाडूंनी नेटमध्ये लागोपाठ सराव केला आहे. भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याने दीपक चाहर (Deepak Chahar) याच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी केली आहे. चाहरने टाकलेल्या फुलटॉस चेंडूवर एक जबरदस्त शॉट खेळला आहे. त्याच्या याच शॉटवर चाहर आणि वीवीएस लक्ष्मण (VVS Laxman) याच्यांत थोडा वाद झाला.
लक्ष्मण हे राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे एशिया कपसाठी मुख्य प्रशिक्षक आहे. द्रविड यांना कोरोना झाल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी लक्ष्मण यांच्यावर सोपवली आहे. त्यांनी नेटमध्ये सराव करणाऱ्या खेळाडूंवर बारीक नजर ठेवली. पंतने मारलेल्या शॉटवर षटकाराचा इशारा त्यांनी केला होता. त्यांच्या या निर्णयावरच चाहरने नाराजी व्यक्त केली
#bcci #indvspak #teamindia #INDvPAK #RishabhPant
Rishabh Pant Hits Helicopter Shot For A Six. pic.twitter.com/1lkKj0ynU9
— Duck (@DuckInCricket) August 26, 2022
लक्ष्मण हे राष्ट्रीय क्रिकेट ऍकडमी, बंगळुरूचे प्रमुख आहेत. त्यांनी जून महिन्यात भारताच्या आयर्लंड दौऱ्यातही संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडली होती. तसेच त्यांनी नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यातही मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
एशिया कपसाठी भारताचा १५ जणांचा संघ निवडला गेला आहे, तर चाहरचा समावेश राखीव खेळाडूमध्ये आहे. रोहित शर्मा याने २०१८च्या एशिया कपमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. तो हंगाम भारतानेच जिंकला होता. तसेच त्याने या स्पर्धेतील ५ सामन्यांत भारताचे नेतृत्व करताना पाचही सामने जिंकले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसीच्या ‘१००% सुपरस्टार’ यादीत स्म्रिती मंधानाचा समावेश, इतर चौघींची नावेही घ्या जाणून
सरावानंतर विराट भेटला पाकिस्तानच्या फॅनला, व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील
दुलीप ट्रॉफीसाठी सज्ज पूर्व विभाग; क्रिडामंत्री कर्णधार तर आयपीएल गाजवणारे साथीदार