---Advertisement---

जुगाडू ग्राऊंड स्टाफ! हिटिंग लाईट्सने कोरडी केली खेळपट्टी, भारत-पाक सामन्याला अखेर सुरुवात

On: सोमवार, सप्टेंबर 11, 2023 5:12 PM
Ground Staff using heating light
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल रविवारी आयोजित सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. आशिया चषक 2023 मध्ये दोन्ही संघ सुपर फोरमध्ये आमने सामने असून हा सामना सोमवारी म्हणजेच रिझर्व्ह डे दिवशी पुन्हा सुरू झाला. पण यासाठी ग्राऊंड स्टाफला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. खेळपट्टी कोरडी करण्यासाठी ग्राऊंड स्टाफकडून अक्षरशः हिटिंग लाईट्सचा वापर केला गेला.

रविवारी (10 सप्टेंबर) भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. 24.1 षठकांचा खेळ झाला असताना भारताची धावसंख्या 2 बाद 147 धावा होती. पण तितक्यात कोलंबोमध्ये पावसाला सुरुवात झाली आणि खेळ तांबवावा लागला. कोलंबोमधील या सामन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यानंतर ग्राऊंड स्टाफने मैदान कोरडे करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतला. त्यावेळी खेळपट्टी आणि आऊटफिल्ड कोरडी करण्यासाठी ग्राऊंड स्टाफ पंख्यांचा वापर केला गेला. पण या सर्वांचा काहीच फायदा झाला नाही, कारण परिस्थिती हातात आली, असे वाटत असतानाच पावसाने पुन्हा हजेरी लागली आणि सामना रविवारी पुन्हा सुरू होऊ शकला नाही.

सोमवारी भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवला गेला होता. आधी अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे रविवारचा खेळ पावसामुळे बिघडला आणि सामना सोमवारपर्यंत लावला. मात्र, सोमवारी देखील सकाळपासूनच कोलंबोमध्ये पाऊस सुरू होता. दुपारी 3 नंतर पाऊस थांबल्याचे दिसले आणि त्यानंतर ग्राऊंड स्टाफची मेहनत पुन्हा एकदा सुरू झाली. यावेळी खेळपट्टी कोरडी करण्यासाठी स्टाफकडून अक्षरशः हिटिंग लाईट्सचा वापर केला गेला. यावेळचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळपट्टी कोरडी करण्यासाठी कदाचीत ही पद्धत पहिल्यांदाच वापरली गेली असावी.

https://twitter.com/SharyOfficial/status/1701186229130113297?s=20

सामन्याचा विचार केला, तर सोमवारी 3 वाजता सुरू होणारा सामना पावसामुळे 4 वाजून 40 मिनिटांनी सुरू झाला. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी अनुक्रमे 8* आणि 17* धावांपासून पुढे खेळायला सुरूवात केली. तत्पूर्वी सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा (56) आणि शुबमन गिल (58) यांनी प्रत्येकी अर्धशतकी योगदान दिले होते.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहिम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.

महत्वाच्या बातम्या – 
रोहित शर्माच्या धुवाधार खेळीनंतर गौतम गंभीरची टीका, दाखवून दिली कमी
VIDEO: न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा कौतुकास्पद निर्णय! कुटुंबीयांनीच जाहीर केली वर्ल्डकप टीम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---