भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात एशिया कप (Asia Cup) स्पर्धेच्या 15व्या हंगामाचा दुसरा सामना खेळला गेला. हा सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला. शेवटच्या षटकामध्ये एका क्षणाला असे वाटले की भारत सामना गमावणार, मात्र अष्टपैलू हार्दिक पंड्याने एमएस धोनीच्या स्टाईलने षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला. तर सामन्यानंतर खुद्द हार्दिकने त्याच्या या स्फोटक खेळीचे श्रेय धोनीला दिले आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने अष्टपैलू खेळी केली आहे. त्याच्या धमाकेदार खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. “मी माही भाईकडून फिनिशरबाबत खूप काही शिकले आहे,” असे म्हणत हार्दिकने त्याच्या उत्तम खेळीचे श्रेय एमएस धोनी(MS Dhoni) याला दिले आहे.
भारताने पाकिस्तानविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारत हातातला सामना गमावेल की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. त्याचक्षणी हार्दिकने 19व्या षटकात तीन चौकार मारले. भारताला विजयासाठी शेवटच्या षटकात ३ चेंडू बाकी असताना 6 धावांची आवश्यकता होती. त्याचवेळी हार्दिकने मोहम्मद नवाजच्या चौथ्या चेंडूवर उत्तुंग षटकार फटकारत संघाला विजय मिळवून दिला.
Hardik Pandya said "I have learnt a lot from Mahi Bhai as a finisher".
— Johns. (@CricCrazyJohns) August 29, 2022
हार्दिकने फिनिशरची योग्य भुमिका निभावली आहे. त्याने रविंद्र जडेजाची विकेट गेल्यावर हार न मानता आपली जबरदस्त फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने या सामन्यात 17 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.
दुबईमध्ये झालेल्या टी२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. यावेळी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 19.5 षटकात 147 धावांवर रोखले. यावेळी हार्दिकने 4 षटकात 25 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने 4 षटकात 26 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तेरा भाई संभाल लेगा..! दबावाच्या क्षणीही दाखवला आत्मविश्वास, हार्दिकचा स्वॅग पाहून चाहते घायाळ
INDvsPAK: मोठ्या पराभवानंतर पाकिस्तानी सुपरफॅनवर आली थेट अॅम्ब्युलन्स शोधण्याची वेळ
नवरा भारताचा अन् पाकिस्तानची बायको, INDvsPAK सामन्यात झाली पंचाईत! फोटो तुफान व्हायरल