यंदाच्या आयसीसी महिला टी20 विश्वचषकला सुरुवात झाली आहे. यावेळी ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जात आहे. भारताने 4 ऑक्टोबर रोजी दुबईत न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला. किवी संघाने भारताचा 58 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला 161 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात भारताचा डाव 102 धावांवर आटोपला.
आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पुढचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत उद्या म्हणजेच 6 ऑक्टोबरला आहे. पाकिस्तानने विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली. त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामन्याची पूर्ण अपेक्षा आहे. पाकिस्तानला हरवून भारत न्यूझीलंडचा पराभव विसरण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊया.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांच्यात टी20 मध्ये आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 10 सामने जिंकले असून पाकिस्तानने 3 सामने जिंकले आहेत. तर टी20 विश्वचषक स्पर्धेत उभय संघांमध्ये झालेल्या 6 सामन्यांपैकी भारताने 4 आणि पाकिस्तानने 2 जिंकले आहेत. पाकिस्तानवर भारताचा दबदबा राहिला आहे. टीम इंडियाही हा सामना जिंकण्यासाठी फेव्हरिट आहे.
या सामन्यासाठी दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील (फिटनेस विषय), सजना सजीवन.
पाकिस्तान : फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोज, इरम जावेद, मुनिबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल (फिटनेसच्या अधीन), सिद्रा अमीन, सय्यदा अरुब शाह, तस्मिया रुबाब, तुबा हसन
हेही वाचा-
‘आता आमच्यासाठी…’, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर काय म्हणाली?
न्यूझीलंडविरुद्धचा हा पराभव भारताला भारी पडणार? टीम इंडियाची पुढील वाट खुपचं खडतर
indw vs nzw; टीम इंडियच्या पराभवाची ही तीन मोठी कारणे..