---Advertisement---

भारताला स्वस्तात गुंडाळण्याची संधी पाकिस्तानकडून ड्रॉप! पावर प्लेमध्ये सलामीवीर फलंदाजाला जीवनदान

On: रविवार, सप्टेंबर 10, 2023 6:17 PM
---Advertisement---

पाकिस्तान संघाने मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या खेळात लक्षणीय सुधारणा केली आहे. आशिया चषक 2023 स्पर्धा सध्या सुरू आहे आणि पाकिस्ताने या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. यजमान संघाने आशिया चषकात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. पण संघाचे क्षेत्ररक्षण मात्र, पूर्वीप्रमाणेच ढिसाळ पाहायला मिळाले. रविवारी (10 सप्टेंबर) भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तान संघासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एख लाजिरवाणा प्रकार लाईव्ह सामन्यात घडला.

भारताने या सामन्यात नाणेफेक गमावल्यामुळे संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल यांनी संघाला वेगवान सुरुवात देण्यात कुठलीच कमी सोडली नाही. पावरप्लेच्या 10 षटकांमध्ये भारताची धावसंख्या बिनबाद 61 धावा होती. पुढे दोन्ही सलामीवीरांनी शतकी भागीदारी पूर्ण केली, ज्यामुळे संघासाठी भक्कम पाया तयार झाला. असे असले तरी, सलामीवीर फलंदाजांची ही जोडी फोडण्याची संध पाकिस्तनला आठव्याच षटकात मिळाली होती. पण खेळाडूंमध्ये झेल घेण्याबाबत गोंधळ झाल्यामुळे शुबमन गिल (Shubman Gill) याला जीवनदान मिळाले.

शुबमन गिल याने आठव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विकेट गमावली असती. पण पहिल्या आणि दुसऱ्या स्लिप्समध्ये उभ्या असणाऱ्या खेळाडूंमध्ये झेल घेण्याबाबत गोंधळ झाला. सोबतच यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान यानेही अधिकच या दोन खेळाडूंना अधिक गोंधळात टाकले. परिणामी तिघांपैकी एकानेही झेल घेतला नाही. असे असले तरी, या तिघांमधून इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) मात्र सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.

https://twitter.com/cricketkhelo11/status/1700813267197956119?s=20

https://twitter.com/hazharoon/status/1700813412031197198?s=20

दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली. पण पावसामुळे खेळ पुन्हा बिघडला. 24.1 षटकांचा खेळ पूर्ण झाला असून भारताने 2 बाद 147 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहितने 49 चेंडूत 56 धावांची खेळी केली. तर शुबमन गिल याने 52 चेंडूत 58 धावांची खेळी केली. विराट कोहली (8*) आणि केएल राहुल (17*) खेळपट्टीवर कायम आहेत. सामना ऐन रंगात असताना पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आणला. याआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ग्रुप स्टेजचा सामना देखील पावसामुळे रद्द केला गेला होता. (IND vs PAK Shubman Gill Catch dropped by Iftikhar Ahmed)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन – 
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहिम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.

महत्वाच्या बातम्या – 
सामन्यात पाकिस्तान गोलंदाजांचे कमबॅक! शतकी भागीदारीनंतर रोहित-गिल तंबूत
नाद करा पण आमचा कुठं! टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण, रोहित अन् गिलचे झंझावाती अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---