भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली शनिवारी (2 सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्ध मोठी खेळी करू शकला नाही. आशिया चषक 2023 मधील भारताचा हा पहिला सामना असून विराटने 7 चेंडूत 4 धावा करून विकेट गमावली. वनडे आशिया चषकातील विराटची आकडेवारी पाहिली तर समाधानकारक आहे. पण मागच्या दोन सामन्यांमध्ये त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाहीये. विशेष म्हणजे हे दोन्ही सामने त्याने पाकिस्तानविरुद्ध खेळले आहेत.
विराट कोहली याने वनडे आशिया चषकात आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यापैकी 11 सामन्यांमध्ये त्याने फलंदाजी केली असून 56.09च्या सरासरीने 617 धावा केल्या आहेत. इतर कोणत्याही भारतीय फलंदाजापेक्षा वनडे आशिया चषकात विराटची आकडेवारी सर्वोत्तम आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहितने याच यादीत 11 डावांमध्ये 323 धावा केल्या आहेत. असे असले तरी, विराटने या 12 पैकी मागच्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही वेळी पाकिस्तानी गोलंदाजांनी विराटला एक आकडी धावसंख्येवर बाद केले आहे. वनडे आशिया चषकातील मागच्या दोन डावांमध्ये त्याने एक आकडी धावसंख्येवर विकेट गमावल्या आहेत. यापूर्वी त्याने एकदाही वनडे आशिया चषकात एक आकडी धावसंख्येवर विकेट गमावली नव्हती. (Virat Kohli’s failed in last 2 ODI Asia Cup innings)
वनडे आशिया चषकात मागच्या दोन डावांमध्ये विराटची आकडेवारी
5(11) विरुद्ध पाकिस्तान, 2014
4(7) विरुद्ध पाकिस्तान, 2023
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शनिवारी झालेला सामना श्रीलंकेती कँडी शहरात झाला. विराट भारतीय संघाचा महत्वपूर्ण फलंदाज असला, तर एक गोष्ट याठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. श्रीलंकेतील विराटची वनडे सरासरी इतर कोणत्याही देशापेक्षा सर्वात कमी म्हणजेच 45.15 राहिली आहे. दक्षिण आफ्रिके विराटने सर्वाधिक 76.38च्या वनडे सरासरीने धावा केल्या आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीची सरासरी (सर्व देशांमध्ये):
76.38 – दक्षिण आफ्रिका
73.13 – बांगलादेश
60.83 – झिम्बाब्वे
58.92 – वेस्ट इंडीज
57.94 – भारत
51.88 – इंग्लंड
51.03 – ऑस्ट्रेलिया
49.66 – न्यूझीलंड
45.15 – श्रीलंका*
आशिया चषका सामन्यासाठी भारत आणि पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
महत्वाच्या बातम्या –
भारताचा सलग तिसरा फलंदाज स्वस्तात बाद! हॅरिस रौफने केली श्रेयस अय्यरची शिकार
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11मधून शमीचा पत्ता कट, सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप