एशिया कप (Asia Cup) या स्पर्धेच्या 15व्या हंगामातील दुसरा सामना रविवारी (28 ऑगस्ट) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK)यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना दुबई येथे खेळला जाणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल क्रिकेटविश्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यामध्ये कोणते भारतीय खेळाडू अंतिम अकरामध्ये खेळतील याबाबत अनेकांनी आपले अंदाज लावायला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे भारताच्या माजी क्रिकेटपटूने रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांनाही संघात घेतले आहे.
भारताचा माजी क्रिकटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) याने दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत यांच्यापैकी कोणाला निवडावे हे स्पष्ट केलेले नाही. त्याने ट्वीटमध्ये लिहिले, ‘पाकिस्तान विरुद्ध माझी भारताची प्लेइंग इलेवन- रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक/रिषभ पंत, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, रवि बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.’ तसेच त्याने पंतला संघात घेतले तर त्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागणार असेही म्हटले आहे.
जाफरने अष्टपैलू दीपक हुड्डा, अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि वेगवान गोलंदाजी आवेश खान यांना प्लेइंग इलेवनच्या बाहेर ठेवले. भारतीय संघात पंत आणि कार्तिक हे दोघे नियमित विकेटकिपर आहेत. यामुळे चाहतेही या दोघांपैकी कोणाला घ्यावे याविषयी आपले मत मांडत आहेत.
My India XI vs Pakistan:
1. Rohit
2. KL
3. Virat
4. Sky
5. Hardik
6. DK / Pant*
7. Jadeja
8. Bhuvi
9. Bishnoi
10. Chahal
11. Arshdeep*If Pant plays, he should bat at no.5.
What's yours?#INDvPAK #AsiaCup
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) August 27, 2022
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पंतची आकडेवारी पाहिली तर ती तेवढी आकर्षक नाही, मात्र त्याने कसोटी आणि वनडेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने 54 टी20 सामन्यांत 23.86च्या सरासरीने 883 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 2022मध्ये 13 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 26.00च्या सरासरीने 260 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने फक्त एकच अर्धशतक केले असून यावेळी त्याची नाबाद 52 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
कार्तिकने मात्र इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2022मध्ये रॉयल चैलेंजर्स बेंगलोरकडून (आरसीबी) खेळताना त्याने उत्कृष्ठ कामगिरी केली होती. त्याने आयपीएलमध्ये आरसीबीकडून 16 सामन्यात 55.00च्या सरासरीने 330 धावा केल्या होत्या. यामध्ये तो दहा वेळा नाबाद राहिला होता. मात्र त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी पाहिली तर चाहत्यांची निराशा होईल. त्याने भारताकडून 47 टी20 सामन्यांत 28.14च्या सरासरीने 591 धावा केल्या आहेत. मात्र त्याने जेव्हापासून भारतीय संघात पुनरागमन केले आहे तेव्हापासून त्याने फिनीशरची योग्य भुमिका पार पाडली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsPAK: बड्या बड्या बाता नाही करणार, मैदानात करून दाखवणार; पाक कर्णधाराची हुंकार
‘वो वर्ल्ड कप याद करो..’, भारताला पुन्हा धोबीपछाड देण्यासाठी कर्णधार आझमचे संघाला मोटिवेशन
पाकिस्तान सावधान! ‘महामुकाबल्या’पूर्वी रोहितची ताकद दुप्पट, बडा दिग्गज भारतीय संघात सामील






