---Advertisement---

फिकीर नॉट! लवकर सुरू होणार INDvsSA संघातील पहिला वनडे सामना, रात्री उशिरापर्यंत जागण्याची नाही गरज, वाचा

On: रविवार, डिसेंबर 17, 2023 11:04 AM
INDvsSA
---Advertisement---

IND vs SA 1st ODI: सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली 3 सामन्यांची टी20 मालिका 1-1ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर आता उभय संघातील पहिला सामना रविवारी (दि. 17 डिसेंबर) खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाची कमान केएल राहुल याच्या हातात आहे. राहुल युवा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. यातील काही खेळाडू असे आहेत, जे दीर्घ काळानंतर वनडे पदार्पण करत आहेत. अशात राहुलवरही थोडा दबाव असण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचा पहिला सामना पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. चला तर, सामन्याविषयी सर्वकाही जाणून घेऊयात…

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे सामन्याविषयी सर्व माहिती (All About INDvsSA 1st ODI)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला वनडे कुठे खेळला जाईल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला वनडे सामना जोहान्सबर्ग येथील न्यू वाँडरर्स स्टेडिअममध्ये खेळला जाईल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला वनडे सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला वनडे सामना रविवारी (दि. 17 डिसेंबर) भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी 1 वाजता नाणेफेक होईल. अशात हा सामना रात्री 10.30च्या आसपास संपण्याची आशा आहे. ज्यामुळे तुम्हाला टी20 सामन्यांप्रमाणे रात्री उशिरा जागून सामना पाहावा लागणार नाही.

कुठे पाहता येईल भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला वनडे सामना?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या वनडे सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या वनडे सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग डिझ्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.

वनडे मालिकेसाठी उभय संघ
भारत
केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वाशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, आकाश दीप

दक्षिण आफ्रिका
एडेन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, नांद्रे बर्गर, टोनी डी जोरजी, रीझा हेंड्रिक्स, हेन्रीच क्लासेन, केशव महाराज, मिहलाली मपोंगवाना, डेविड मिलर, वियान मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, तबरेज शम्सी, रासी व्हॅन डर ड्युसेन, काइल वेरेने, लिझाद विलियम्स (ind vs sa 1st odi all about india vs south africa know here)

हेही वाचा-
रोहित मुंबई इंडियन्सची साथ सोडून आयपीएल 2024च्या लिलावात सामील होणार? वाचा सविस्तर
राजकोटमध्ये घडला इतिहास! हरियाणा पहिल्यांदाज विजय हजारे ट्रॉफीचा मानकरी, राजस्थानला चारली पराभवाची धूळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---