भारतीय दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने पहिलाच सामना जिंकत दौऱ्याची उत्तम सुरूवात केली आहे. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर गुरूवारी (९ जून) झालेल्या या हायव्होल्टेज सामन्यात दोन्ही संघांची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली आहे. यावेळी एक विश्वविक्रमही रचला गेला आहे.
या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी विरोधी गोलंदाजांना चांगलेच धुतले. यावेळी ३९.१ षटकात ४२३ धावांचा पाऊस पडला. यामध्ये २८ षटकारांचा समावेश आहे. एका आंतरराष्ट्रीय सामन्यात २८ पेक्षा अधिक षटकार मारले आहेत. मात्र पहिल्यांदाच दोन्ही संघातील सात खेळाडूंंनी ३ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारताकडून इशान किशन (Ishan Kishan), ऋतूराज गायकवाड, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि श्रेयस अय्यर या फलंदाजांनी ३ षटकार खेचले आहेत. तसेच कर्णधार रिषभ पंतनेही २ षटकार मारले. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रिटोरियनने ४, रस्सी वॅन डर दुसेन आणि डेविड मिलर (David Miller) यांनी प्रत्येकी ५-५ षटकार मारले आहेत. यामुळे या सामन्यात एकूण २८ षटकार मारले आहेत. त्यातील दोन्ही संघाने प्रत्येकी १४-१४ षटकार मारले आहेत.
याआधी सहा खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे. २००९मध्ये ख्रिस्टचर्च येथे खेळलेल्या न्यूझीलंड विरुद्ध भारत आणि २०२१मध्ये ओव्हल स्टेडियम, ड्युडिन येथे न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यांमध्ये सहा खेळाडूंनी ३ किंवा ३ पेक्षा अधिक षटकार मारले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. या सामन्यातून हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिकने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. सलामीवीर इशान किशनने ७६ धावा करत संघाला उत्तम सुरूवात करून देत, हार्दिकनेही उत्तम फलंदाजी करत २५० पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने १२ चेंडूत ३१ धावा केल्या. भारताने ४ विकेट्स गमावात २० षटकात २११ धावा धावफलकावर लावल्या.
डेविड मिलर आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) फॉर्म कायम राखत २००पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने खेळत ६४ धावा आणि रस्सी वॅन डर दुसेनने ७५ धावा केल्या आहेत. मिलर-दुसेनने यांनी चौथ्या विकेट्ससाठी नाबाद १३१ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भुमिका पार पाडली आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेने पाच चेंडू आणि ७ विकेट्स शिल्लक राखत जिंकला आहे.
या मालिकेत भारतीय संघ रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) दुसरा टी२० सामना बाराबाती स्टेडियम, कटक येथे १२ जूनला खेळला जाणार आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मिलरची भारताविरुद्ध ‘किलर’ खेळी, सामनावीर बनत ‘मिस्टर ३६० डिग्री’चा मोठा विक्रम काढला मोडित
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर कुलदीप भावुक, चहलने केले सांत्वन
IND vs SA । पहिला टी२० सामना हरल्यानंतर कर्णधार रिषभ पंतने स्पष्ट केले कारण, म्हणाला…