भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा टी२० सामना बाराबती स्टेडियम, कटक येथे सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंडन डी कॉक हाताच्या दुखापतीमुळे मुकला आहे. त्याच्याऐवजी हेन्रीच क्लासेनला संघात घेतले आहे. भारतीय संघात कोणतेच बदल झाले नाही.
पाहुण्या संघ पहिला सामना जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत १-०ने पुढे आहेत. या सामन्यात भारताची अडखळत सुरूवात झाली आहे. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवरच भारतीय संघाला झटका बसला. कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याने टाकलेल्या या चेंडूवर भारताचा सलामीवीर ऋतूराज गायकवाड बाद झाला आहे. ही विकेट घेत रबाडाने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
रबाडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५० विकेट्स घेणारा तिसरा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने ४२ सामन्यात ही कामगिरी केली आहे. त्याच्याआधी डेल स्टेन आणि इमरान ताहिर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५० किंवा ५० पेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ५० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू-
डेल स्टेन
इमरान ताहिर
कागिसो रबाडा*
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१४ला पदार्पण करताना २७ वर्षीय रबाडाने ५२ कसोटी सामन्यात खेळताना २४३ विकेट्स घेतल्या आहेत. ८५ वनडे सामन्यात १३२ विकेट्स घेतल्या आहेत.
रबाडा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५० विकेट्स घेणारा चौथा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू ठरला आहे. स्टेनने ४७ सामन्यात ६४ आणि इमरान ताहिर ३५ सामन्यात ६१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तब्रेझ शम्सीने ४९ सामन्यात ५७ विकेट्स घेतल्या आहेत.
या सामन्यात भारताने २० षटकात ६ विकेट्स गमावत १४८ धावा केल्या आहेत. या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारत दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे प्रयत्न करणार आहे. दिनेश कार्तिकने फिनीशरची भुमिका बजावत २१ चेंडूत २ षटकार आणि २ चौकार मारले असता ३० धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने ४० आणि इशान किशनने ३४ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बटलरने ज्या बॅटने गाजवली आयपीएल, ती बॅट दिसणार आता ‘या’ अभिनेत्याच्या ‘शोपीस’मध्ये
धोनीचा ‘हा’ विक्रम मोडण्याची डी कॉकची सुवर्णसंधी हुकली, दुसऱ्या टी२०मधून बाहेर