इंडियन प्रीमियर लीगनंतर (आयपीएल) सध्या भारतात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेबद्दलच जोरदार चर्चा सुरू आहे. या मालिकेत पाच टी२० सामने खेळले जाणार असून यजमान संघाने दिल्लीत झालेला सामना ७ विकेट्सने गमावला आहे. दुसरा सामना रविवारी (१२ जून) बाराबती स्टेडियम, कटक येथे खेळला जात आहे.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम अकराचा संघ घोषित केला असता, दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंडन डी कॉक याला हाताची दुखापत झाल्याने तो या दुसऱ्या सामन्यास मुकला आहे. त्याच्याऐवजी हेन्रीच क्लासेनची संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय संघात कोणताच बदल करण्यात आला नाही.
डी कॉक जर या सामन्यात खेळला असता तर त्याला आपल्या नावे एक विक्रम करण्याची संधी होती. आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ५० झेल पूर्ण करण्यासाठी त्याला एक झेल कमी पडला आहे. जर त्याने हे अर्धशतक केले असते तर तो हा पराक्रम करणारा दुसराच खेळाडू ठरला असता. भारताचा माजी कर्णधार-यष्टीरक्षक एमएस धोनीने झेल घेण्याचे अर्धशतक आपल्या नावे केले आहे. आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या यष्टीरक्षकामध्ये अव्वल क्रमांंकावर आहे.
धोनीने ९८ सामन्यामध्ये यष्टीरक्षण करताना ९१ खेळाडूंना बाद केले आहेत. त्यातील ५७ झेल घेतले असून ३४ स्टम्पिंग केले आहेत. डी कॉकने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ६४ खेळाडूंना बाद केले असून त्यातील ४९ झेल आणि १५ खेळाडूंना स्टम्प केले आहे.
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक झेल घेणारे यष्टीरक्षण-
५७ – एमएस धोनी
४९* – क्विंटन डी कॉक
४३ – दिनेश रामदीन
३२ – मुशफिकुर रहीम
२८ – कामरान अकमल
भारताने पहिल्या सामन्यात तुफानी फलंदाजी करत २११ धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले होते. डेविड मिलर आणि रस्सी वॅन दर दुसेन यांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद १३१ धावांची खेळी केली. मिलरने नाबाद ६४ आणि दुसेनने ७५ धावा केल्या होत्या.
भारताने दुसऱ्या सामन्यात ऋतूराज गायकवाडची विकेट लवकर गेली. शेवटचे वृत्त हाती आले असता भारताच्या २ षटकात एक विकेट गमावत ११ धावा झाल्या आहेत. श्रेयस अय्यर आणि इशान किशन खेळत आहेत.
भारताचा अंतिम अकरा जणांचा संघ– रिषभ पंत (कर्णधार), ऋतूराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, आवेश खान.
दक्षिण आफ्रिकेचा अंतिम अकरा जणांचा संघ– टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेन्ड्रीक्स, रस्सी वेन डर दुसेन, डेविड मिलर, हेन्रीच क्लासेन (यष्टीरक्षक), ड्वेन प्रीटोरियस, वेन पार्नेल, केशव महाराज, तबरेज शम्सी, कगिसो रबाडा, एनरीच नोर्किया.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ एका निर्णयाने जडेजासह मुंबई इंडियन्स आलेली गोत्यात
काय सांगता! द्रविडने फोडलेला प्रेक्षकाच्या हातातला ग्लास, पाहा व्हिडिओ