भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी (१२ जून) दुसरा टी२० सामना खेळला जाणार आहे. बाराबती स्टेडियम, कटक येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ भुवनेश्वरमधील मेफेयर या हॉटेलमध्ये १३ जूनपर्यत थांबणार आहे. यामुळे या हॉटेलमधील स्टाफ खेळाडूंना काही अडचण होऊ नये याची जय्यत तयारी करत आहेत. हॉटेलचे शेफ यांनी संघानुसार जेवणाचे मेन्यू ठरवले आहेत.
खेळाडूंचेे जेवण कमी तेल आणि मसाले वापरून तयार केले जाणार आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी नॉन वेज जेवणाचे काही पदार्थ बनवले जाणार आहे. तसेच ओडीसाच्या पांरपरिक पदार्थचांही मेन्यूमध्ये समावेश केला आहे. हे जेवण ओडीयाच्या पंरपरेनुसार कांस्य आणि काही पदार्थ काचेच्या ताटामध्ये वाढले जाणार आहेत.
नाश्त्याच्या प्रकारामध्ये टोस्टेड ब्रेड, दूध, दही, नारळ पाणी, चहा, कॉफी, दाक्षिणात्य पदार्थ आणि ऑमलेट यांचा समावेश असणार आहे. तर दुपारच्या जेवणात बासमती आणि कनिका तांदूळापासून तीन पदार्थ बनवले जाणार आहेत. जेवणाच्या मेन्यूमध्ये चपाती, चिकन, मटण आणि माश्याचे पदार्थ, प्रॉन, पनीर, कैरीचे लोणचे, रायता, सॅलड यांचाही समावेश करण्यात आला आहे.
कोरोना महामारीमुळे मागच्या मोठ्या काळापासून कटकमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाहीये. अशात चाहत्यांमध्ये या सामन्यासाठी उत्साह स्पष्टपणे दिसत आहे. या सामन्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ शुक्रवारी (१० जून) ओडिशात दाखल झाले आहेत.
दिल्ली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला २११ धावा करूनही ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ १-०ने आघाडीवर आहे. दुसऱ्या सामन्यातून भारत मालिकेत परतण्यासाठी कशी कामगिरी करेल याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
या मालिकेत भारतीय संघ रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत असून फलंदाजांनी मागील सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. तर दोन्ही संघांंच्या फिरकीपटूंनी अधिक मार खाल्ला होता.
या मैदानावर २०१७मध्ये खेळल्या गेलेल्या टी२० सामन्यात भारताने श्रीलंकेचा ९३ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात युझवेंद्र चहलने ४ आणि हार्दिक पंड्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. तर या मैदानावरील सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघातच झाला होता. यावेळी भारत एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. या सामन्यात भारतीय संघ ९२ धावांतच सर्वबाद झाला होता. हा सामना दक्षिण आफ्रिकेने १७ चेंडू शिल्लक राखत ६ विकेट्सने जिंकला होता.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
होऊदे खर्च! आयपीएल संपल्यानंतर आंद्रे रसेलने घेतली नवीन लग्जरी कार, किंमत माहितीय का?
‘श्रेयसला संघात टिकून रहायचे असल्यास त्याला आपला खेळ सुधरावा लागेल’, भारतीय दिग्गजाचा अय्यरला सल्ला