---Advertisement---

SAvsIND, 2nd Test, Live: तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेच्या २ बाद ११८ धावा, भारताकडे अजून १२२ धावांची आघाडी

On: बुधवार, जानेवारी 5, 2022 9:11 PM
Dean Elgar And Cheteshwar Pujara
---Advertisement---

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सोमवारपासून (३ जानेवारी) कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला आहे. द वाँडरर्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याचा बुधवारी तिसरा दिवस होता. या दिवशी दक्षिण आफ्रिकेने भारताच्या २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ४० षटकांमध्ये २ बाद ११८ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीम एल्गार (४६ धावा) आणि रासी वान डर डूसेन (११ धावा) फलंदाजी करत आहेत. भारताकडे अजून १२२ धावांची आघाडी आहे.

एग्लार आणि डूसेनपूर्वी सलामीवीर ऍडम मार्करच्या रूपात संघाला पहिला धक्का बसला होता. तो शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर ३१ धावांवर पायचित झाला होता. त्याच्यानंतर किगन पीटरसन २८ धावांवर आर अश्विनच्या गोलंदाजीवर पायचित झाला होता.

https://twitter.com/BCCI/status/1478754513825591297?s=20

https://twitter.com/OfficialCSA/status/1478750928408924161?s=20

तत्पूर्वी भारतीय संघाचा दुसरा डाव ६०.१ षटकांत २६६ धावांवर संपुष्टात आला आहे आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेसमोर २४० धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात पहिल्या १० षटकांमध्येच भारताला पहिले यश मिळाले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. चहापानाच्या ब्रेकपर्यंत त्यांनी बिनबाद ७ षटके खेळून काढली. परंतु भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने दहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्करमला ३१ धावांवर पायचित करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली. यासह दक्षिण आफ्रिकेचा संघ १० षटकांनंतर १ बाद ४७ धावा अशा स्थितीत आहे. त्यांना विजयासाठी अजून १८० पेक्षा जास्त धावांची गरज आहे. तिसऱ्या क्रमांकावर किगन पीटरसन फलंदाजीला आला आहे.

https://twitter.com/ICC/status/1478717473671335936?s=20

द वाँडरर्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याचा बुधवारी तिसरा दिवस आहे. या दिवशी भारतीय संघाचा दुसरा डाव ६०.१ षटकांत २६६ धावांवर संपुष्टात आला आहे. तसेच भारताला पहिल्या डावात २७ धावांची पिछाडी स्विकारावी लागली असल्याने भारताने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर २४० धावांचे आव्हान ठेवले आहे.

यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. चहापानाच्या ब्रेकपर्यंत त्यांनी एकही विकेट न गमावता ७ षटकांमध्ये ३४ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर ऍडम मार्करम (२४ धावा) आणि कर्णधार डीन एल्गार (१० धावा) मैदानावर आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1478709297512992770?s=20

दुसऱ्या सत्रात, हनुमा विहारीला शार्दुल ठाकूरने चांगली साथ दिली. या दोघांनी चांगला खेळ करत भारताची आघाडी जवळपास २०० धावांपर्यंत वाढवली होती. या दरम्यान शार्दुल ठाकूरने काही आक्रमक फटकेही खेळले. पण, त्याला मार्को जेन्सनने ५० व्या षटकात बाद केले आणि त्याची व विहारीची ४१ धावांची भागीदारी तोडली.

तो बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीही ५२ व्या षटकात जेन्सनच्याच गोलंदाजीवर शुन्यावर माघारी परतला. पण, त्यानंतर बुमराहने विहारीची साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुमराह एक षटकारासह ७ धावा करून ५७ व्या षटकात लुंगी एन्गिडीविरुद्ध फटका मारताना जेन्सनकडे झेल देऊन बाद झाला. यादरम्यान, बुमरहची आणि जेन्सन यांच्यात शाब्दिक वादावादीही झालेली पाहायला मिळाली.

अखेरच्या विकेटसाठीही मोहम्मद सिराजला साथीला घेत विहारीने झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण अखेर ६१ व्या षटकात लुंगी एन्गिडीने मोहम्मद सिराजला शुन्यावर त्रिफळाचीत करत भारताचा डाव २६६ धावांवर संपुष्टात आणला. विहारी ४० धावा करून नाबाद राहिला.

https://twitter.com/BCCI/status/1478699275873783808

रहणे-पुजाराची शतकी भागीदारी

तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतीय संघाने दुसऱ्या डावातील २१ व्या षटकापासून आणि २ बाद ८५ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. भारताकडून दुसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेली चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने तिसऱ्या दिवशी खेळाला पुढे नेण्यास सुरुवात केली. या दोघांनी भारताला २३ षटकांत १०० धावांचा आकडा पार करून दिला.

या दोघांनीही पुढेही चांगला खेळ केला. दोघांनीही सुरुवातीपासून काही आक्रमक फटके खेळण्यावर भर दिला. त्यामुळे भारताचे धावफलक झपाट्याने हलताना दिसले. पुजाराने ३० व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने केवळ ६२ चेंडू खेळले. त्याच्यानंतर ३२ व्या षटकात रहाणेने देखील अर्धशतक पूर्ण केले. याबरोबरच या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण झाली.

https://twitter.com/ICC/status/1478651387219165184

मात्र, रहाणे आणि पुजाराची ही शतकी भागीदारी तोडण्यात वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला यश आले. त्याने रहाणेला ३५ व्या षटकात ५८ धावांवर बाद केले. राहणेने या खेळीत ८ चौकार आणि १ षटकार मारला. त्याच्यानंतर ३७ व्या षटकात पुजारालाही रबाडानेच माघारी धाडले. पुजारा १० चौकारांसह ५३ धावांवर पायचीत झाला. त्यापाठोपाठ ३९ व्या षटकात रिषभ पंत देखील रबाडाविरुद्ध खेळतानाच काइल व्हेरेनेकडे झेल देऊन शुन्यावर बाद झाला.

https://twitter.com/ICC/status/1478662093142474753

पंत बाद झाल्यानंतर हनुमा विहारीला साथ देण्यासाठी आर अश्विन आला. मात्र, अश्विनही फार काही करू शकला नाही. तो १४ चेंडूत आक्रमक १६ धावांची खेळी करून बाद झाला. त्याला लुंगी एन्गिडीने बाद केले. त्यानंतर शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला.

पहिल्या सत्राखेर भारताच्या ४४ षटकात ६ बाद १८८ धावा केल्या.

https://twitter.com/BCCI/status/1478669660199395328

या सामन्यात भारताने पहिल्या डावात २०२ धावा केल्या होत्या, तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात २२९ धावा करत २७ धावांची आघाडी घेतली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---