युझवेंद्र चहलला मागच्या वर्षी यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात संधी मिळाली नव्हती. चहल चांगल्या फॉर्ममध्ये असून देखील त्याला विश्वचषकात संधी मिळाली नसल्यामुळे अनेकांनी यावर टीका केली होती. अशात आया यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात त्याला संधी मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा आहे. याच पारश्वभूमीवर इरफान पठाण आणि संजय मांजरेकर यांनी चहल सध्या करत असेलेल्या प्रदर्शनासाठी त्याचे कौतुक केले.
मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात संधी मिळाली नसली तरी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) मात्र चांगले प्रदर्शन करत राहिला. आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्यामुळे त्याला पर्पल कॅप मिळला. सध्या सुरू असेलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेतही चहल चांगेल प्रदर्शन करत आहे. मालिकेतीस शेवटचा सामना रविवारी (१९ जून) रोजी पावसामुळे रद्द झाला. २-२ अशा बरोबरीवर मालिकेचा निकाल लागला.
एका माध्यमावर बोलताना भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) म्हणाले की, जरी मागच्या विश्वचषकात चहलला संघात जागा मिळाली नसली, तरी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या स्पर्धेत तो ट्रँप कार्ड ठरणार आहे. बांगर यांच्या मते चहल मधल्या षटकांमध्ये धावांवर अंकुश आणू शकतो. त्याव्यतिरिक्त अंतिम षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मोठमोठ्या मैदानांवर शॉट्स खेळणे सोपे नसेल. याठिकाणी त्याचा अनुभव कामी येईल.
चर्चेत इरफान पठाण (Irfan Pathan) देखील उपस्थित होता. इरफान म्हणाला की, चहल खूपच चतूर गोलंदाज आहे. अशात शेवटच्या षटकांमध्ये त्यासा मोठे शॉट्स मारणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे असणार नाही. संजय बांगर म्हणाले की, अनिल कुंबळेनंतक युझवेंद्र चहल भारतीय संघाला सासत्याने सेवा पुरवत आहे. तो संघाचा मजबूत दुवा आहे.
दरम्यान, चहलच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत ४ टी-२० सामन्यांमध्ये १९ च्या सरासरीने ६ विकेट्स घेतल्या आहेत. माकिलेतील एका सामन्यात त्याने ३ षटकांमध्ये २० धावा खर्च केल्या आणि ३ विकेट्स घेतल्या. हे त्याचे या चालू मालिकेतील सर्वोत्तम प्रदर्शन राहिले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५८ टी-२० सामन्यांमध्ये २५ च्या सरासरीने ७४ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाचा दिग्गजही धोनीचा ‘जबरा फॅन!’, सोशल मीडियावर शेअर केली अभिमानास्पद पोस्ट
रणजी ट्रॉफी २०२१-२२। मुंबईचे खेळाडू सगळीकडे गाजतायत, पाहा आकडेवारी
‘भारतासाठी चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी हा खेळाडू योग्य’, झहीर खानने सांगितले कारण






