टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ विजयीरथावर सवार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने अनुक्रमे पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांना पराभवाची धूळ चारली. आता भारताला विश्वचषक स्पर्धेतील तिसरा सामना दक्षिण आफ्रिका संघासोबत खेळायचा आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्किया याने खास प्रतिक्रिया दिली आहे. नॉर्कियाच्या मते या सामन्यात भारतीय फलंदाज आणि जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमणांपैकी एक अशी लढत असेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 सामन्यापूर्वी एन्रिच नॉर्किया माध्यमांशी बोलत होता. दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज आणि भारतीय फलंदाजांमधील ही टक्कर असेल का? असा प्रश्न नॉर्कियाला विचारला गेला. यावर नॉर्किया (Anrich Nortje) म्हणाला की, “होय, आम्ही स्वतःला जगातील सर्वोत्तम वेगावन गोलंदाजी आक्रमणांपैकी एक मानतो. आमच्या गोलंदाजी खूप विविधता आहे आणि आम्ही खूप साऱ्या गोष्टी कवर करतो. आम्ही कोणत्याही संघाविरुद्ध कधीही विजय मिळवू शकतो. आमच्याकडे दोन युवा गोलंदाज आहेत. आम्ही भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.”
विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. अशा चांगल्या फॉर्ममधील फलंदाजांचा दक्षिण आफ्रिका संघ कसा सामना करणार? या प्रश्नाचेही नॉर्कियाने उत्तर दिले. तो म्हणाला, “आमचे संपूर्ण लक्ष्य याच गोष्टीवर आहे की, आम्हाला काय करायचे आहे.” दरम्यान, विश्वचषक सुरू असला, तरी ऑस्ट्रेलियातील वातावरण मात्र बघडल्याचेच दिसत आहे. पावसामुळे विश्वचषकातील काही महत्वाचे सामने रद्द केले गेले आणि पुढेही काही सामने रद्द करावे लागू शकतात.
अशात दक्षिण आफ्रिका संघ पावसामुळे भविष्यात एखादा सामना रद्द जरी झाला, तरी त्यासाठी तयारी करत आहे. संघ भविष्यात रद्द होणाऱ्या सामन्यांची कसर आधीच भरून काढण्यासाठी प्रयत्नात आहे. नॉर्किया पुढे बोलताना म्हणाला की, “याची शक्यता आहे की आमचा आणि पुढे खेळले अनेक सामने पावसामुळे रद्द होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जो सामना खेळत आहात, तो जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही एका वेळी एकाच सामन्याचा विचार करत आहोत.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडचा श्रीलंकेलाही दणका! 65 धावांनी विजय मिळवत सेमी-फायनलकडे केली आगेकूच
आता पाकिस्तानी चाहतेच उडवू लागले आपल्या संघाची खिल्ली; म्हणाले…