---Advertisement---

IND vs SA: टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, पांड्याचा कमबॅक, गिलच्या दुखापतीबद्दलही मोठी अपडेट समोर

On: बुधवार, डिसेंबर 3, 2025 5:50 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. ज्यात हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांचे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय टी20 संघात पुनरागमन झाले आहे.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी रिंकू सिंगला संघातून वगळण्यात आले आहे. नितीश कुमार रेड्डीलाही टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंना संघातून वगळण्याचे कारण निवड समितीने अद्याप दिलेले नाही.

स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या 2025च्या आशिया कपमध्ये खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे, परंतु आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून संघात परतला आहे. हार्दिकने अलीकडेच पंजाबविरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात 42 चेंडूत 77 धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले.

टीम इंडिया (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी)

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे
अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर

टीप: *शुभमन गिलची निवड BCCI COE कडून फिटनेस क्लीअरन्स मिळाल्यावरच निश्चित होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---