Rohit Sharma Press Conference: भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपली अखेरची 2 सामन्यांची कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून खेळणार आहे. या मालिकेत भारताचे काही खेळाडू असे असतील, जे थेट वनडे विश्वचषक 2023 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसतील. त्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी रोहित शर्मा पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसला. यावेळी त्याने एका पत्रकाराला उत्तर देताना मजेतच झापले.
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत जिंकला नाही कसोटी मालिका
भारतीय संघ (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या मायदेशात 31 वर्षांपासून एकही कसोटी मालिका जिंकू शकला नाहीये. अशात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ वनडेप्रमाणे कसोटी मालिकाही आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल.
पत्रकाराला उत्तर
कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याने बॉक्सिंग डेला (Boxing Day) सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना रोहितला एका पत्रकाराने टी20 विश्वचषकात पुनरागमनाविषयी प्रश्न केला. तो प्रश्न असा होता की, “तुम्ही जेव्हा जिंकण्याविषयी बोलता, तेव्हा तुम्हाला टी20 विश्वचषक म्हणायचे आहे का?”
या प्रश्नाचे उत्तर देताना रोहित म्हणाला की, “जेव्हाही खेळाडूंना संधी मिळेल, तेव्हा त्यांना प्रदर्शन करावे लागेल. तुम्हाला काय म्हणायचे आहे, हे मला चांगलेच माहितीये. तुम्हाला लवकरच त्याचे उत्तर मिळेल.”
Question: When you talk about desperation to win, do you mean the T20 WC?
Rohit Sharma said "Whenever the boys get the opportunity, they have to perform. I know what you are trying to say, you will get the answer soon". [Smiles] pic.twitter.com/YtobuItLE6
— Johns. (@CricCrazyJohns) December 25, 2023
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळण्यासाठी आला आहे. यातील टी20 मालिका 1-1ने बरोबरीत सुटली. कारण, पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने पहिला आणि तिसरा सामना जिंकून मालिका 2-1ने नावावर केली होती. विशेष म्हणजे, टी20 आणि वनडे मालिकेत भारताचे अनेक वरिष्ठ खेळाडू नव्हते. हे वरिष्ठ खेळाडू आता कसोटी मालिकेत परतले आहेत. अशात भारतीय संघ इतिहास घडवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. (ind vs sa boxing day test captain rohit sharma replied on icc t20 world cup come back question said you will get answer soon)
हेही वाचा-
‘मला त्याच्याविषयी खात्री नाही, त्याने मला खोटं ठरवावं…’, गावसकरांचे भारताच्या प्रमुख गोलंदाजाविषयी भाष्य
‘रोहितला ती गोष्ट बदलावीच लागेल…’, वर्ल्डकपनंतर थेट कसोटीत खेळणाऱ्या ‘हिटमॅन’विषयी दिग्गजाचे विधान