भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना मंगळवारी (25 डिसेंबर) सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेने या सामन्याची नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केल्यानंतर आफ्रिकी संघाने सुरुवातीच्या विकेट्स देखील झटपट मिळवल्या. पण विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सांभाळला. पण यादरम्यान, दक्षिण आफ्रिका संघासाठी एक चिंतेची बाब समोर आली. त्यांचा कर्णधार टेम्बा बाऊमा याला दुखापत झाली.
दक्षिण आफ्रिका संघाचा कसोटी फॉरमॅटमधील कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत महत्वाची भूमिका पार पाडताना दिसू शकतो. उभय संघांतील ही दोन सामन्यांची कसोटी मालिका मंगळवारी (26 डिसेंबर) म्हणझे बॉक्सिंग डे रोजी सुरू झाली. मालिकेच्या पहिल्याच दिवशी बाऊमाचे हॅमस्ट्रिंग दुखावले गेले, अशा बातम्या समोर येत आहेत. सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मंगळवारी प्रथम फलंदाजीसाठी आला. पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना बाऊमाला ही दुखापत झाली.
भारताच्या पहिल्या डावातील 20व्या षटकात मार्को यान्सेन गोलंदाजी करत होता. षटकाती चौथ्या चेंडूवर विराट कोहली याने कव्हर ड्राईव्ह मारला. हा चेंडू सीमारेषेपार जाऊ नये यासाठी बाऊमाने धाव घेतली. पण यादरम्यानच त्याला दुखापत देखील झाली. दुसरीकडे आऊटफिल्ड ओली असल्यामुळे सीमारेषेपर्यंत पोहोचलाही नाही. बाऊमाला वेदनेत दिसतात दक्षिण आफ्रिका संघाचे फिजिओ माैदानात आले आणि त्याला लाईव्ह सामन्यातून मैदानाबाहेर नेले. सध्या ऍडेन मार्करम दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधाराच्या भूमिकेत आहे. जेवणाच्या ब्रेकपर्यंत भारताने पहिल्या डावात 26 षटकांमध्ये तीन विकेट्सच्या नुकसानावर 91 धावा केल्या आहेत.
(IND vs SA boxing Day test Temba Bavuma walks off, and Aiden Markram is the stand-in captain.)
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया खेळाडूंच्या ख्रिसमस भेटीबद्दल माजी खेळाडूची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला, ‘सौरव गांगुली स्टीव्ह वॉसाठी असे…’
INDvsSA 1st Test: यजमानांनी टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, भारतासाठी कृष्णाचे पदार्पण; जड्डू बाहेर