---Advertisement---

उमेश की इशांत? केपटाऊन कसोटीत कोणाला मिळणार संधी?

On: रविवार, जानेवारी 9, 2022 1:14 AM
ishant-umesh
---Advertisement---

दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात खेळली जाणारी कसोटी मालिका (sa vs ind test series) सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. उभय संघातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळला जाणार आहे. परंतु तिसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारताच्या प्लेइंग इलेव्हनविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे हॅमस्ट्रिंग दुखावले गेले होते. याच पार्श्वभूमीवर तिसऱ्या सामन्यासाठी त्याच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशात इशांत शर्मा (ishant sharma) आणि उमेश यादव (umesh yadav) या दोन वेगवान गोलंदाजांपैकी एकाला संघात सामील केले जाऊ शकते.

इशांत शर्माला अनुभव आणि उंचीचा फायदा

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन उमेश यादवऐवजी इशांत शर्माला संघात सामील करण्यासाठी समर्थन देईल, असे सांगितले जात आहे. इशांत शर्माकडे १०० पेक्षा जास्त कसोटी सामन्यांचा अनुभव आहे आणि निसर्गाची देण असलेली उंची देखील आहे. त्याची उंची ६ फुट ३ इंच आहे आणि दक्षिण अफ्रिकेच्या खेळपट्टीवर उंच गोलंदाजांना मदत मिळत असल्याचे दिसत आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड दक्षिण अफ्रिकेतील परिस्थितीवर बोलताना म्हणाले होते की, “असे वाटत होते की चेंडू त्यांच्यासाठी (दक्षिण अफ्रिकी गोलंदाजांसाठी) थोडी अधिक हालचाल करत होता, याचे कारण त्यांच्या गोलंदाजांची उंची असू शकते.”

विदेशी खेळपट्टीवर उमेशपेक्षा इशांतला अधिक महत्व

भारतीय संघाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी देखील पुढच्या कसोटीत इंशांतला संधी मिळण्याचे संकेत दिले आहेत. एका वृत्तसंस्थेशी बोलताना प्रसाद म्हणाले की, “आपल्याला जोहान्सबर्गमध्ये एका उंच वेगवान गोलंदाजाची कमतरता भासली. आपल्याकडे केवळ इशांत शर्मा आहे. अशाप्रकारच्या खेळपट्टीवर मी त्याला उमेशच्या पुढे ठेवेल. जर ही भारतीय खेळपट्टी असती, तर उमेश पहिली पसंती असता.”

द्रविड आणि प्रसादव्यतिरिक्त भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक आणि सुप्रसिद्ध समालोचक दीप दासगुप्ता यांनी देखील इशांतच्या नावाला पसंती दिली. दासगुप्तांच्या मते, इशांतला केपटाऊन कसोटीत उंचीचा फायदा होईल. तसेच न्यूझीलंडमधील स्टेडियम समुद्र किनारी असल्यामुळे आणि हवेत दमटपणा असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना याठिकाणी फायदा होईल.

महत्वाच्या बातम्या –

दिल्लीची फिनिक्स भरारी! यूपीवर मात करत अव्वलस्थान केले काबीज

आयसीसीच्या नव्या टी२० नियमांवर भलताच खूश झाला भारतीय दिग्गज; म्हणाला…

PHOTOS: जेसन रॉय दुसऱ्यांदा बनला ‘बाबा’; शेअर केले ‘हॅप्पी’ फॅमिलीचे फोटो

व्हिडिओ पाहा –

टोकियो ऑलिम्पिक... भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा | India at Tokyo Olympics 2020

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---