भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of South Africa) आहे. भारताला या दौऱ्यात तीन सामन्यांच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत. २६ डिसेंबरला कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले. पण सामन्याच्या दुसऱ्या दुवशी पावसाने अडथळा निर्माण केला. पावसाच्या कारणास्तव दुसऱ्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. परंतु यादरम्यान भारतीय खेळाडूंनी स्वादिष्ट जेवणाचा आनंद नक्कीच घेतला.
भारतीय संघासाठी दुपारच्या जेवणात ब्रॉकली सूप, चिकन चेत्तीनाड, डाळ, लँब चॉप्स, वेजिटेबल कडाई आणि पनीर टिक्का यांच्यासह तोंडाला पाणी आणणारे इतरही मेनू होते. पावसामुळे सकाळच्या सकाळ सत्रात खेळ होऊ शकला नव्हता. त्यानंतर पंचांनी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या ११.३० वाजता खेळपट्टीची पाहणी करण्याचे ठरवले होते. यादरम्यान दुपारच्या जेवणाचा ब्रेक लवकर घेतला गेला होता. परंतु नंतर खेळपट्टीची ही पाहणी एक तास आणि १५ मिनिटे पुढे ढकलण्यात आली. त्यामध्ये नंतर अजून उशीर झाला, कारण पाऊस चालूच होता. शेवटी स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजता पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
हवामान अंदाजानुसार मंगळवार आणि बुधवार हे पुढचे दोन दिवस वातावरण चांगले राहील, असे सांगितले गेले आहे. अशात भारतीय संघाला फलंदाजीत वेग आणावा लागेल, जेणेकरून त्यांना सामन्यावर मजबूत पकड बनवता येईल. दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यामुळे पंच राहिलेल्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त खेळ उरकण्याच्या प्रयत्नात असतील. षटकांची भरपाई करण्यासाठी राहिलेल्या तीन दिवसांमध्ये प्रत्येकी ९८ षटके टाकली जातील.
दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने अप्रतिम प्रदर्शन केले आहे. भारतीय संघाने पहिल्या दिवशी तीन विकेट्सच्या नुकसानावर २७२ धावा केल्या आहेत. यामध्ये केएल राहुलच्या शतकाचे महत्वाचे योगदान राहिले आहे. तसेच कर्णधार विराट कोहली (३५) आणि सलामीवीर मयंक अगरवाल (६०) यांनीही महत्वाची खेळी केली. सध्या केएल राहुल (१२२) आणि अजिंक्य रहाणे (४०) खेळपट्टीवर कायम आहेत.
महत्वाच्या बातम्या –
भारतीय अंडर १९ संघाची आशिया कपच्या उपांत्य फेरीत धडक; जुन्नरचा कौशल ठरला सामनावीर
डेशॉर्न ब्राउनची हॅटट्रिक; नॉर्थ ईस्ट-मुंबई सिटी एफसी लढत ३-३ बरोबरीत
दानवीर सूर्या! मैदान कर्मचाऱ्यांचे कौतुक करत केली ‘ही’ अमूल्य मदत
व्हिडिओ पाहा –