स्थानिक क्रिकेट स्पर्धा पोलिस शिल्ड संपल्यानंतर भारतीय संघाचा उत्कृष्ट फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने चाहत्यांची मने जिंकली. त्याने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तुफान खेळी केली आणि सामना संपल्यानंतर मैदानावरील स्थानिक कर्मचाऱ्यांला अर्थिक मदत केली. सूर्यकुमारने या सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर मिळालेली रक्कम या कर्मचाऱ्यांना दिली.
सूर्यकुमारने तीन दिवसीय पोलीस शिल्ड अंतिम सामन्यात पयाडे स्पोर्ट्स क्लब संघाविरुद्ध पारसी जिमखाना संघाकडून खेळला. या सामन्यात त्याने १५२ चेंडूत २५९ धावांची मोठी खेळी केली. सामना संपल्यानंतर सूर्यकुमार म्हणाला मैदानावरील कर्मचाऱ्यांचे योगदान कोणीच लक्षात घेत नाही.
एका वृत्तपत्राशी बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, “मला वाटते की, ही एक गोष्ट आहे, जी आपण क्रिकेटपटूंच्या रूपात नेहमी विसरतो. मैदानावरील कर्मचारी जे प्रयत्न करतात, त्याविषयी कमी चर्चा होते. मैदानावर ते सर्वात आधी येतात. ते सकाळी ६.३० वाजता येतात. खेळपट्टी तयार करतात, दव बाजूला करतात. या गोष्टी माझ्या मनाच्या जवळ आहेत. कारण, जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा मला लक्षात आहे की, जेव्हा कधी मला नेट्समध्ये फलंदाजी करायची असायची, तेव्हा मला मैदानावरील कर्मचारी आणि माझ्या मित्रांसोबत खेळपट्टीवर रोलर फिरवावा लागायचा.”
“मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या कामाकडे कोणाचेच लक्ष जात नाही. आपण धावा करतो, सगळे आपले कौतुक करतात. आपण स्वतःची नावे वृत्तपत्रात पाहतो, पण हे वाईट आहे की, मैदानावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कष्टासाठी कोणीच धन्यवाद देत नाही. माझ्यामते, प्रत्येक खेळाडूने मैदानावरील कर्मचाऱ्याच्या योगदानाला लक्षात ठेवले पाहिजे. ते आपल्यासाठी खेळपट्टी तयार करता. ते या गोष्टीची पुष्टी करतात की, आपण आपली कारकीर्द चांगल्या खेळपट्टीच्या जोरावर बनवू शकतो. ते या श्रेयाचे खूप हकदार आहेत,” असे सूर्यकुमार पुढे बोलताना म्हणाला.
महत्वाच्या बातम्या –
‘धोनीने जेव्हा कसोटीतून निवृत्ती घेतली, तेव्हा खेळाडूंना बसलेला धक्का’, माजी प्रशिक्षकाचा खुलासा
शेरास सव्वाशेर! २०२१ मधील ४ घटना, जेव्हा भारतीय खेळाडूंनी विरोधी क्रिकेटर्सला दिलेले जशास तसे उत्तर
…म्हणून भारतीय खेळाडूंनी पाळले मौन, तर साऊथ आफ्रिकन क्रिकेटर्सने दंडावर बांधली काळी पट्टी
व्हिडिओ पाहा –