---Advertisement---

बड्डेदिनी स्वत:लाच कोट्यवधींची कार भेट देत इमोशनल झाला ‘हा’ क्रिकेटर, सांगितले भावुक करणारे सत्य

Evin-Lewis
---Advertisement---

आजकाल प्रत्येक व्यावसायिक क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच इतर क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत भरपूर प्रसिद्धी आणि सोबतच चिक्कार पैसा कमवत असतो. त्यातही इंडियन प्रीमियर लीगसारख्या जगप्रसिद्ध टी२० लीगमुळे तर क्रिकेटपटूंचे खिसे भरगच्च भरताना दिसतात. मात्र कोणत्याही क्रिकेटपटूला ही अमाप संपत्ती कमवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. असेच काहीसे दिवस पाहणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये नाव येते, वेस्ट इंडिजच्या एविन लुईस (Evin Lewis) याचे. हाच लुईस आज त्याचा ३० वा वाढदिवस साजरा (Evin Lewis 30th Birthday) करतो आहे.

वेस्ट इंडिजच्या या धुव्वाधार सलामीवीराने आपल्या ३० व्या वाढदिवसानिमित्त स्वत:ला कोट्यावधींची कार भेट (Expensive Car) दिली आहे. आपल्या चाहत्यांसोबत ही गोष्ट शेअर करताना तो अत्यंत भावुक झाला आहे.

आयुष्यात अनेकप्रसंगी हलाखीचे दिवस पाहणाऱ्या लुईसला कधीकाळी टॅक्सीमध्येही बसू दिले जात नसायचे. परंतु आज त्याने स्वत कोट्यावधींची पॉश कार खरेदी केली आहे. आपल्या या कारचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याने या कारला आपली स्वप्नातील कार असे संबोधले आहे.

या फोटोसोबतच मोठे कॅप्शन लिहित त्याने आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, ‘मला आजही तो दिवस आठवण आहे, जेव्हा मी माझीमोठी क्रिकेट किट बॅग घेऊन टॅक्सीची वाट पाहात असायचो. कधी-कधी तर मला टॅक्सी मिळाली तरी त्यात बसू दिलं जात नसायचं. कारण माझ्याकडे किट बॅग असायची.’

हेही वाचा- Video: पप्पा हार्दिकला सोबतीला घेत अगस्त्यची जबरदस्त फलंदाजी, काका कृणालनेही गोलंदाजी करत दिली साथ

दरम्यान लुईसला टी२० क्रिकेटमधील सर्वात घातक फलंदाजांमध्ये गणले जाते. त्याने वर्ष २०२१ मध्ये टी२० क्रिकेटमध्ये ८२ षटकार ठोकले आहेत. तो या वर्षभरात टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या याच पावर हिटिंगच्या शैलीमुळे तो आयपीएलमध्ये कोट्यवधी रुपये कमावतो.

वर्ष २०२१ मध्ये तो आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये २१ सामने खेळताना ५८१ धावा केल्या आहेत. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, लुईसने २०१६ पासून आतापर्यंत ५७ वनडे आणि ५० टी२० सामने खेळले आहेत. ५७ वनडे सामने खेळताना ४ शतकांच्या मदतीने त्याने १८४७ धावा केल्या आहेत. तर टी२० क्रिकेटमध्ये ५० सामने खेळताना १४२३ धावा चोपल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

काय असते व्हीजेडी प्रणाली? का या पद्धतीला डकवर्थ लुईसपेक्षा चांगले समजते जाते? जाणून घ्या

ज्या डीआरएसने वाचवले, त्याबद्दलच वाईट बोलला हॅरिस; आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाल्याने वाढलं टेंशन

चौथ्या अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत टेनिसनट्स, महाराष्ट्र मंडळ, डेक्कन गोल्डन बॉईज संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

हेही पाहा-

त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली भारी भेट| Virat's First Century And Gambhir's Gift

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---