नुकताच विजय हजारे ट्रॉफी २०२१ चा अंतिम सामना झाला आहे. या सामन्यात तमिळनाडू आणि हिमाचल प्रदेश, हे संघ आमने सामने होते. प्रथम फलंदाजी करताना दिनेश कार्तिकच्या शतकाच्या जोरावर तमिळनाडूने ३१४ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात हिमाल प्रदेशने ४७.३ षटकात २९९ धावा केल्या होत्या. तरीही व्हीजेडी प्रणाली (VJD Method) अंतर्गत त्यांनी सामना जिंकला आणि पहिलेवहिले विजय हजारे ट्रॉफी जेतेपदही पटकावले आहे. खराब प्रकाशामुळे या प्रणालीचा वापर केला गेला आहे.
मात्र यानंतर क्रिकेटरसिकांमध्ये ही व्हीजेडी प्रणाली नक्की काय असते? (What Is VJD Method) याची गणना कशी केली जाते? आणि ही पद्धत डकवर्थ लुईस पद्धती (Duckworth Lewis Method) पेक्षा कशी वेगळी आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
काय आहे व्हीजेडी मेथड?
व्हीजेडी प्रणाली ही पावसामुळे व्यत्यय निर्माण झालेल्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये लक्ष्य मिळालेल्या धावसंख्येची गणना करण्याची एक पद्धत आहे. ही पद्धत केरळच्या सिव्हील इंजिनियर व्ही. जयदेवन यांनी तयार केल्यामुळे त्याला व्हीजेडी असे नाव देण्यात आले आहे. या पद्धतीला डीएलएस म्हणजेच डकवर्थ, लुईस आणि स्टर्न पद्धतींचा पर्याय म्हणून पाहिले जाते. या पद्धीचा वापर यापूर्वी इंडियन क्रिकेट लीगमध्ये केला जात होता. तसेच तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये आजही या पद्धतीने लक्ष्य मिळालेल्या धावा मोजल्या जातात.
व्हीजेडी पद्धतीची विशेषता
या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, यामध्ये जुन्या आकडेवारीला गणले जाते आणि संघाच्या सध्याच्या फॉर्मला यात पकडले जात नाही. यामध्ये डावाला वेगवेगळ्या भागांमध्ये विभागले जाते. सुरुवातीच षटके, ज्यामध्ये क्षेत्ररक्षणातील निर्बधांमुळे वेगाने धावा बनतात. मधली षटके, ज्यामध्ये रनरेट कमी असतो आणि अंतिम षटकांमध्ये हाच रनरेट वाढत जातो. संपूर्ण सामन्यादरम्यान खेळाडू एकाच प्रकारे खेळू शकत नाहीत, ते प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या दृष्टीकोनातून खेळतात. त्यामुळे या पद्धतीचा एकप्रकारे खेळाडूंना उपयोग होतो.
डीएलएसपेक्षा किती वेगळा आहे व्हीजेडी नियम?
डीएलएस पद्धतीत असे समजले जाते की, रनरेट सातत्याने वाढत जातो. यानुसारच वातावरणामुळे सामन्यात कोणता अडथला निर्माण झाल्यास लक्ष्य निर्धारित केले जाते.
दोन्ही पद्धतींमध्ये लक्ष्य वेगळे कसे असू शकते?
उदाहरणासह-
संघ १, धावा १५०: DLS लक्ष्य ९३, VJD लक्ष्य ९१
संघ १, धावा २००: DLS लक्ष्य १२४, VJD लक्ष्य ११८
संघ १, धावा २५०: DLS लक्ष्य १५४, VJD लक्ष्य १४२
संघ १, धावा ३००: DLS लक्ष्य १६३, VJD लक्ष्य १६३
संघ १, धावा ३५०: DLS लक्ष्य १७४, VJD लक्ष्य १८२
महत्त्वाच्या बातम्या-
ज्या डीआरएसने वाचवले, त्याबद्दलच वाईट बोलला हॅरिस; आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाल्याने वाढलं टेंशन
Video: पप्पा हार्दिकला सोबतीला घेत अगस्त्यची जबरदस्त फलंदाजी, काका कृणालनेही गोलंदाजी करत दिली साथ
हेही पाहा-