---Advertisement---

ज्या डीआरएसने वाचवले, त्याबद्दलच वाईट बोलला हॅरिस; आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाल्याने वाढलं टेंशन

Marcus-Harris-On-DRS
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामना खेळला जात आहे. हा सामना ऍशेस मालिका २०२१ (Ashes Series 2021) चा भाग आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा  खेळ संपेपर्यंत पाहुण्या इंग्लंड संघाने ४ बाद ३१ धावा केल्या आहेत. ते अजून यजमान ऑस्ट्रेलियापेक्षा ५१ धावांनी मागे आहेत. यादरम्यान मैदानात असा काही प्रसंगा पाहायला मिळाला आहे, ज्याच्यावर सर्वत्र टीका होते आहे. तर सामन्यादरम्यान नक्की असे काय घडले?

त्याचे झाले असे की, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्कस हॅरिस (Marcus Harris) आणि इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) यांच्यातील मैदानावरील एक संभाषण स्टंप माईकमध्ये कैद झाले आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत हॅरिस मजेशीर अंदाजात डीआरएस प्रणालीला कोसताना (Marcus Harris Slams DRS) दिसतो आहे. यादरम्यान त्याच्या तोंडून अभद्र भाषा निघाल्याने, त्याच्यावर टीकेचा भडिमार होतो आहे. 

हा प्रसंग बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना घडला. मैदानावर तळ ठोकून जबरदस्त फलंदाजी करत असलेल्या हॅरिसला स्टोक्सच्या एका चेंडूवर मैदानी पंचांनी बाद दिले होते. यावर हॅरिसने डीआरएस घेतला. यामध्ये तो नाबाद असल्याचे दिसल्याने पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला. यानंतर जेव्हा हॅरिस नॉन स्ट्राईकवर आला, तेव्हा स्टोक्सने त्याला विचारले होते की, काय झाले होते?. यावर हॅरिसने त्याला पूर्ण किस्सा ऐकवला आणि शेवटी तो म्हणाला, हॉटस्पॉट हा …  हताश करणारा आहे. यावेळी त्याने अपशब्दही वापरला.

https://twitter.com/4sacinom/status/1475276326407913472?s=20

त्याचे हे संभाषण स्टंप माईकमध्ये कैद झाले असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर क्रिकेटशी संबंधित डीआरएस प्रणालीबद्दल अफशब्द वापरल्याने हॅरिसला शिक्षाही होऊ शकते.

हेही वाचा- बॉक्सिंग डे कसोटीत ‘या’ कारणामुळे इंग्लंड संघ काळी फीत बांधून उतरला मैदानात

दरम्यान हॅरिसने बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात सर्वाधिक धावा केल्या होत्या. सलामीला फलंदाजीला येताना ७ चौकारांच्या मदतीने त्याने ७६ धावा कुटल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज या डावात साधे अर्धशतकही करू शकला नाही. इंग्लंडच्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने या डावात २६७ धावाच जोडल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडचे सलामीवीर २०२१ वर्षात सुपरफ्लॉप! नको असलेल्या विक्रमाच्या यादीत गाठले अव्वल स्थान

Video: पप्पा हार्दिकला सोबतीला घेत अगस्त्यची जबरदस्त फलंदाजी, काका कृणालनेही गोलंदाजी करत दिली साथ

बॉक्सिंग डे कसोटीत ‘या’ कारणामुळे इंग्लंड संघ काळी फीत बांधून उतरला मैदानात

हेही वाचा- 

बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही... | What is Boxing Day Test? History of Boxing Day

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---