INDvsSA Series: भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 10 डिसेंबरपासून 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर 3 सामन्यांची वनडे मालिका आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. या तिन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली आहे. आता दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघ घोषित केला आहे. वनडे मालिकेसाठी टेम्बा बावुमा याच्या जागी एडेन मार्करम याला कर्णधार बनवण्यात आले आहे.
कोण करणार नेतृत्व?
दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) आणि कागिसो रबाडा (Kagiso Rabada) यांना मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती दिली आहे. हे दोन्ही खेळाडू 2 कसोटी मालिकेचा भाग असतील. अशात दक्षिण आफ्रिका संघाने टी20 आणि वनडे मालिकेसाठी एडेन मार्करम (Aiden Markram) याला कर्णधार बनवले आहे. यापूर्वीही त्याने कर्णधारपद भूषवले आहे. तसेच, गेराल्ड कोएट्जी, मार्को यान्सेन, आणि लुंगी एन्गिडी तिसऱ्या टी20 आणि वनडे मालिकेत खेळणार नाहीत.
तिन्ही क्रिकेट प्रकारातील मालिकांसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
कसोटी संघ
टेम्बा बावुमा (कर्णधार), डेविड बेडिंघम, नांद्रे बर्गर, गेलार्ड कोएट्जी, टी डी जोरजी, डीन एल्गर, मार्को यान्सेन, केशव महाराज, एडेन मार्करम, वियान मुल्डर, लुंगी एन्गिडी, के पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल वेरिन.
🟢 SQUAD ANNOUNCEMENT 🟡
CSA has today named the Proteas squads for the all-format inbound tour against India from 10 Dec – 7 Jan 🇿🇦🇮🇳
Captain Temba Bavuma and Kagiso Rabada are amongst a group of players that have been omitted for the white-ball leg of the tour in order to… pic.twitter.com/myFE24QZaz
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 4, 2023
वनडे संघ
एडेन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, नांद्रे बर्गर, टोनी डी जोरजी, रीझा हेंड्रिक्स, हेन्रीच क्लासेन, केशव महाराज, मिहलाली मपोंगवाना, डेविड मिलर, वियान मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, तबरेज शम्सी, रासी व्हॅन डर ड्युसेन, काइल वेरिन आणि लिझाद विलियम्स.
टी20 संघ
एडेन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीट्जके, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएट्जी (पहिला आणि दुसरा T20I), डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन (पहिला आणि दुसरा T20I), हेन्रीच क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी (पहिला आणि दुसरा टी20), अँडिले फेहलुक्वायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाद विलियम्स. (ind vs sa cricket south africa team announced for series against india t20 odi and test squad 2023 read)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक (INDvsSA Series Timetable)
टी20 मालिका
10 डिसेंबर- पहिला सामना, डर्बन
12 डिसेंबर- दुसरा सामना, गकेबरहा
14 डिसेंबर- तिसरा सामना, जोहान्सबर्ग
वनडे मालिका
17 डिसेंबर- पहिला वनडे, जोहान्सबर्ग
19 डिसेंबर- दुसरा वनडे, गकेबरहा
21 डिसेंबर- तिसरा वनडे, पार्ल
कसोटी मालिका
26 ते 30 डिसेंबर- पहिला सामना, सेंच्युरियन
3 ते 7 जानेवारी- दुसरा सामना, केप टाऊन
हेही वाचा-
‘मला गोलंदाजी करायची आहे, पण…’, श्रेयस अय्यरचा गोलंदाजी करण्याबाबत धक्कादायक खुलासा
‘अर्शदीप सिंग, तू भारताच्या…’, शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजय मिळवून देताच ट्विटरवर प्रतिक्रियांचा पूर