भारतीय संघ रविवारी (30 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल. टी-20 विश्वचषक 2022 मधील हा भारताचा तिसरा सामना आहे. टी-20 विश्वचषक 2022 मधील हा 30 वा सामना असून पर्थ येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आमने सामने असतील. भारताने जर हा सामना जिंकला, तर संघ उपांत्य फेरीच्या एक अजून जवळ जाईल. तसेच दक्षिण आफ्रिका संघाने जर भारताला मात दिली, तर त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान देखील पक्के होऊ शकते.
भारतीय संघाने टी-20 विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्थान आणि नेदरलँड्स यांना अनुक्रमे पराभूत केले आहे. भारत सध्या ग्रुप दोनमध्ये गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे आणि संघ उपांत्य सामन्यात जागा पक्की करेल, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. भारताला अजून झिम्बाब्वे, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासोबत प्रत्येकी एक-एक सामना खेळायचा आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध होता, जो पावसामुळे निकाली निघाला नाही. तर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने बांगलादेशला 104 धावांनी पारभूत केले. दक्षिण आफ्रिका सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशात उभय संघांत रविवारी होणारी ही लढत निर्णायक ठरू शकते.
हवामान अंदाज –
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यादरम्यान पर्थमध्ये पावसाचा कोणताही अंदाज वर्तवला गेला नाहीये. चाहत्यांसाठी ही आनंदाजी बातमी आहे. चाहते या संपूर्ण सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
कुठे पाहायचा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना –
उभय संघांतील हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहाता येऊ सकतो. तसेच मोबाईल किंवा कोणत्याही इतर डिजिटल उपकरणावर हॉटस्टार या ओटीडी ऍपवर या सामन्याचा आनंद चाहते घेऊ शकतात.
कशी असेल पर्थ स्टेडियमची खेळपट्टी?
पर्थ स्टेडियमची खेळपट्टी ऑस्ट्रेलियातील सर्वात वेगवान खेळपट्ट्यांपैकी एक आहे. खेळपट्टी वेगवान असल्यामुळे गोलंदाजा नेहमीच याठिकाणी वर्चस्व करताना दिसले आहेत. फलंदाजांना याठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
नाणेफेक आणि सामन्याची वेळ –
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना रविवार, 30 ऑक्टोबर रोजी रात्री 4 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. या सामन्यासाठी 4 वाजता नाणेफेक केली जाईल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यासाठी संभावित प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन/हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.
दक्षिण अफ्रीका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिले रुसौव, एडन मार्कराम, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पार्नेल, केशव महाराज, कैगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, तबरेज शम्सी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“सूर्याला कसोटीमध्ये संधी आणि मग खेळ पाहा”; भारतीय दिग्गजाची संघ व्यवस्थापनाकडे मागणी
“युवी माझ्यावर नाराज झाला असेल”; रोहितने केला धक्कादायक खुलासा