भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका नुकतीच पार पडली. गुरुवारी (21 डिसेंबर) या मालिकेचा शेवटचा सामना खेळला गेला, जो भारताने 78 धावांनी जिंकला. अर्शदीप सिंग याला मालिकावीर म्हणून निवडले गेले. तसेच पहिल्या वनडे सामन्यात अर्शदीप सामनावीर ठरला होता. रविवारी (24 डिसेंबर) अर्शदीपने शेअर केलेल्या एका पोस्टची चांगलीच चर्चा होत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका भारताने 1-2 अशा फरकाने नावावर केली. मालिकेतील पहिल्या सामन्यात अर्शदीपने सिंग (Arshdeep Singh) याने विकेट्सचे पंचक नावावर केले, ज्यासाठी त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. मालिकेतील दुसरा सामन्यात अर्शदीपने एक, तिसऱ्या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. त्याने मालिकेतील घेतलेल्या एकूण 10 विकेट्स भारतासाठी महत्वाच्या ठरला. याच कारणास्तव अर्शदीप मालिकावीर देखील ठरला. मालिका संपल्यानंतर अर्शदीप मायदेशी परतला असून त्याने आपल्या आई-वडिलांचा खास पोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटोत अर्शदीप सिंगच्या आई आणि वडिलांच्या हातात त्याला मिळालेला मालिकावीर आणि सामनावीर पुरस्काराची ट्रॉफी दिसत आहे. हा पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, भारतीय संघाला या वनडे मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना पहिला कसोटी सामना मंगळवारी (26 डिसेंबर) तर दुसरा सामना 3 जानेवारी रोजी सुरू होईल. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रविंद्रन अश्विन, शुबमन गिल आणि शार्दुल ठाकूर या खेळाडूंना कसोटी मालिकेसाठी संघात सामील केले गेले आहे. युवा यशस्वी जयसवाल यालाही कसोटी संघात संधी दिली गेली आहे. (IND vs SA OSI Series Arshdeep Singh shared a special post of his parents on Instagram)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (सी), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह vc), प्रसिध कृष्णा, केएस भरत (wk)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक –
26 ते 30 डिसेंबर 2023 – पहिला कसोटी सामना, सुपर स्पोर्ट्स पार्क, सेंचुरियन
03 ते 07 जानेवारी 2024 – दुसरा कसोटी सामना, न्यूलँड्स, कॅप टाऊन
IND vs SA । कसोटीत राहुलला विकेटकिपिंगची संधी! प्रशिक्षक द्रविडकडून खास संदेश
40000डॉलर गणेश नाईक आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत रशियाच्या एकतेरिना मकारोवाला अग्रमानांकन