Kagiso Rabada Records: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिला कसोटी सामना फलंदाज म्हणून खूपच खराब ठरला. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्कमध्ये खेळला गेलेल्या पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात रोहित 5 धावा करून तंबूत परतला, तर दुसऱ्या डावात त्याला खातेही खोलता आले नाही. त्याला या सामन्यात दोन्ही वेळा कागिसो रबाडा या वेगवान गोलंदाजाने आपल्या जाळ्यात अडकवले. यासह रबाडाने खास विक्रम केला.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासाठी कसोटीत कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याच्याविरुद्ध खेळणे एक न सोडवता आलेले कोडेच पाहायला मिळाले आहे. दुसऱ्या डावात रबाडाने रोहितला आऊटस्विंग चेंडू टाकला, जो थोडा बाहेर निघण्यासोबतच ऑफ स्टम्पवर जाऊन लागला. तसेच, रोहितची विकेट घेतल्यानंतर रबाडाने एका खास क्लबमध्ये एन्ट्री केली.
रोहित शर्माला तिन्ही क्रिकेट प्रकारात शून्यावर बाद करणारा पहिला गोलंदाज
कागिसो रबाडा याने पहिल्या कसोटीत रोहितला शून्यावर बाद करताच एक खास पराक्रम केला. तो असा की, रबाडा आता रोहितला तिन्ही क्रिकेट प्रकारात म्हणजेच, कसोटी, वनडे आणि टी20त रोहितला शून्यावर बाद करणारा पहिला गोलंदाज बनला आहे. तसेच, कसोटीत रोहितची रबाडाविरुद्धची आकडेवारी पाहिली, तर ती खूपच खराब आहे. त्यात त्याने रबाडाविरुद्ध 11 डावात फक्त 104 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला 7 वेळा विकेट गमवावी लागली आहे. रोहितने रबाडाविरुद्ध फक्त 14.85च्या सरासरीने फलंदाजी केली आहे.
भारताविरुद्ध 50 कसोटी विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकेचा पाचवा गोलंदाज
कसोटी क्रिकेटमध्ये कागिसो रबाडाने रोहितची विकेट घेताच एका खास क्लबमध्ये एन्ट्री केली. रबाडा आता दक्षिण आफ्रिकेचा पाचवा गोलंदाज बनला आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध 50 विकेट्स घेतल्या आहेत. रबाडापूर्वी हा कारनामा ऍलन डोनाल्ड, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल आणि शॉन पोलॉक यांचा समावेश आहे. यात स्टेन यादीत सर्वात पुढे आहे. त्याने भारताविरुद्ध कसोटीत एकूण 65 विकेट घेतल्या होत्या. (ind vs sa pacer kagiso rabada first bowler dismissing rohit sharma on duck in all formats and completed 50 test wickets against india 2023)
हेही वाचा-
‘इंट्रा स्क्वॉड म्हणजे निव्वळ चेष्टा…’, टीम इंडियाच्या सराव सामना न खेळण्यावर भडकले गावसकर
AUS vs PAK: दुसऱ्या कसोटीत कांगारूंकडून पाकिस्तानची 79 धावांनी धुळधाण, मालिकाही घातली खिशात; कमिन्स ठरला हिरो