भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात रमणदीप सिंगने टीम इंडियासाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पणही होते. या फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा रमणदीप सिंग हा भारताचा 118वा खेळाडू ठरला आहे. रमणदीपसाठी हा सामना संस्मरणीय होता. त्याने फलंदाजीला आल्यानंतर हा सामना आणखी संस्मरणीय बनवला आणि पहिल्याच चेंडूवर अशी कामगिरी केली. ज्याचा विचार करायलाही फलंदाज घाबरतात.
खरे तर, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकणारा रमणदीप सिंग हा भारताचा दुसरा फलंदाज ठरला. अनेकदा एखादा खेळाडू जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवतो तेव्हा तो हवेत शॉट्स खेळणे टाळतो. कारण त्याला सिंगल, डबल किंवा फोर मारून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अस्वस्थता दूर करायची असते. पण हा नवा भारत आहे आणि रमणदीपही भारताचा उगवता तारा आहे. अशा परिस्थितीत त्याने षटकार मारण्यापासून मागे हटला नाही.
रमणदीप सिंगच्या आधी फक्त सूर्यकुमार यादवच भारतासाठी अशी कामगिरी करू शकला. 2001 नंतरच्या आकडेवारीनुसार, सूर्या आणि रमणदीप हे एकमेव भारतीय आहेत ज्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात षटकाराने केली. या सामन्यात रमणदीपला 6 चेंडू खेळण्याची संधी मिळाली आणि तो 15 धावा करून धावबाद झाला. षटकार मारण्याबरोबरच त्याने आपल्या डावात एक चौकारही मारला.
सामन्यापूर्वी रमणदीप सिंगला व्हीव्हीएस लक्ष्मण आणि हार्दिक पांड्या यांनी पदार्पणाची कॅप दिली होती. व्हीव्हीएसने हार्दिककडे ही कॅप दिली. त्यांनी ती रमणदीप सिंगकडे दिली. रमणदीप सिंग हा देखील हार्दिक पांड्यासारखा वेगवान अष्टपैलू खेळाडू आहे. आयपीएलशिवाय तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोलंदाजी करतो. पण कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याला पहिल्या सामन्यात गोलंदाजी करायला लावली नाही. वेगवान गोलंदाजाच्या जागी त्याचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता.
हेही वाचा-
तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याची प्लॅनिंग कोणाची? सामन्यानंतर मोठा खुलासा
IND VS SA; भारतीय संघाने रचला इतिहास; टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ
अर्शदीपने बुमराह-भुवीचे रेकॉर्ड तोडले, असा चमत्कार करणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज