भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (rohit sharma) सध्या दुखापतीमुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) आहे. दुखापतीमुळे तो दक्षिण अफ्रिका दौऱ्याच्या (south africa tour of india) सुरुवातीच्या टप्प्यात सहभागी होऊ शकला नाही आणि कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. परंतु आता रोहितच्या फिटनेसविषयी एक चांगली बातमी समोर येत आहे आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत तो सहभाग घेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
रोहितला नुकतेच भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवले गेले आहे. अशात चाहत्यांना आगामी एकदिवसीय मालिकेत त्याच्या पुनरागमनाची अपेक्षा आहे. इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माने सुरुवातीचा फिटनेस चाचाणी पार केली आहे. रविवारी (२६ डिसेंबर) त्याच्या काही इतर चाचण्या घेतल्या जातील आणि त्या पार केल्यानंतर तो पूर्णपणे फिट असेल.
एक विश्वसनीय सूत्राने देलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रोहितची पहिली चाचणी यशस्वीरित्या पार केली आहे आणि तो फिट वाटत आहे. सूत्रांनी सांगितले की, “रोहित शर्मा फिट वाटत आहे. त्याने सुरुवातीच्या चाचण्या पास केल्या आहेत. तो आता एनसीएमध्ये आहे आणि उद्या त्याची अंतिम चाचमी होऊ शकते.”
यावेळी सूत्राने असेही सांगितले की, “आता या गोष्टींंबाबत जास्त घाई करण्याची आवश्यकता नाही. एकदा चाचणी झाल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल.”
हेही वाचा- ‘मास्टर ब्लास्टर’ सचिनलाही पडली रोहितच्या कसोटीतील फलंदाजीची भुरळ, कौतुकाने म्हणाला…
दरम्यान, रोहितसोबतच भारताचे दोन फिरकी गोलंदाज अक्षर पटेल (axar patel) आणि रवींद्र जडेजा (ravindra jadeja) देखील दुखापतग्रस्त आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही फिरकी गोलंदाजांविषयी घाई करण्याची गरज नाहीय. हे दोघे अजून पूर्णपणे तंदुरुस्त झालेले नाहीत. तसेच दक्षिण अफ्रिका दौऱ्यात फिरकी गोलंदाजांची भूमिका कमी महत्वाची असते. सध्या जडेजा आणि अक्षर हे दोघेही दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर आहेत. अक्षर पटेलने नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगले प्रदर्शन केले होते.
महत्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी २०२१: ‘पुणेरी पलटन’ने उघडले विजयाचे खाते, ‘तेलुगू टानटन्स’वर मिळवला थरारक विजय
रोहित तर आहेच, पण त्याच्यानंतर कोण? रवी शास्त्रींनी सांगितले भारताच्या कर्णधारपदाचे २ भावी उमेदवार
व्हिडिओ पाहा –