भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला डाव गुरुवारी (28 डिसेंबर) दुसऱ्या सत्रात संपला. पहिल्या डावाच्या शेवटी दक्षिण आफ्रिका संघाला 163 धावांची आघाडी मिळाली असून यजमान संघाने सामन्यावरील पकड कायम ठेवली आहे. डीन एल्गरचे द्विशतक अवघ्या 15 दावांनी हुकल्यानंतर मार्को यान्सेन यानही अप्रतिम खेळी केली. दुसरीकडे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यासाठी कोसटी क्रिकेटमधील पुरनगामन जबरदस्त राहिले.
दक्षिण आफ्रिकने दिसऱ्या दिवसाचा खेळ 5 बाद 256 धावांपासून पुढे सुरू केला. 66 षटकांचा खेळ झाला होता. खेळपट्टीवर तिसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी डीन एल्गर (140*) आणि मार्को यान्सेन (3*) आले. एल्गरने दुसऱ्या दिवसाप्रमाणेच तिसऱ्याही दिवसी भारतीय गोलंदाजांचा घाम काढला. पण गरजेच्या वेळी विकेट मिळवून देणारा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यावेळीही आपले काम करून गेला. डावातील 95व्या षटकात शार्दुलने डाकलेल्या बाऊंसर चेंडूवर एल्गर यष्टीरक्षक केएल राहुल्चया हातात झेलबाद झाला.
मार्को यान्सने यानेही 147 चेंडूत 84* धावांची सुरेख खेळी केली. आफ्रिकी फलंदाज एका बाजूने विकेट्स गमावत असताना यान्सेन मात्र शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याआधी मध्यक्रमात डेव्हिड बेडिंगहॅम यानेही 87 चेंडूत 56 धावांचे योगदान दिले. या तीन फलंदाजांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेसाठी एखही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. तिसऱ्या दिवशी डीन एल्गरच्या रुपात संघाला पहिला झटका बसला. त्यानंतर गेराल्ड कोएत्झी (19), कागिसो रबाडा (1), आणि नांद्रे बर्गर (0) या तळातील फलंदाजांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र आफ्रिकी संघासाठी महत्वाचे ठरणारे ऍडेन मार्करम (5), टोनी डी झोर्झी (28), कीगन पीटरसन (2) आणि काईल वेरेन (4) यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या होत्या.
South Africa have a massive lead at the end of their first innings ⚡#WTC25 | #SAvIND 📝: https://t.co/cbcETm0nBv pic.twitter.com/e0ZXvQC9T4
— ICC (@ICC) December 28, 2023
भारतासाठी या डावात जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या. जुलै 2022 नंतर पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या बुमराहने या चार विकेट्ससाठी 26.4 षटके गोलंदाजी केली आणि 69 धावा खर्च केल्या. यातीर पाच षटके बुमराहने निर्धाव टाकली. मोहम्मद सिराज यानेही 24 षटकात 91 धावा खर्च केल्यानंतर 2 विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (IND vs SA South Africa lead by 163 runs after the first innings of the Boxing Day Test)
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या –
द्विशतक हुकले पण एल्गरने महान फलंदाजांच्या पंक्तीत मिळवले स्थान, वाचा 185 धावांची खेळी का ठरली खास
IND vs AUS ODI: जेमिमा अन् पूजाच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचे कांगारूंना 283 धावांचे आव्हान