बॉक्सिंग डे कसोटी सामना सध्या दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड दिसत आहे. पहिल्या डावात भारतीय संघ स्वस्तात बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने मात्र पहिल्याच डावात मोठी आघाडी मिळवली. माजी कर्णधार डीन एल्गर आपले द्विशतक पूर्ण करणार, असे दिसत होते. पण मोक्याच्या वेळी त्याला नशिबाची साथ मिळाली नाही. असे असले तरी, एल्गरच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ मानले जातात. या दोन संघांमध्ये याआधीही अनेकदा रोमांचक सामने आणि मालिका पार पडले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही दिग्गज खेळाडूही भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाने दिले आहेत. डीन एल्गर (Dean Elgar) देखील कसोटी क्रिकेटमधील मोठा खेळाडू राहिला आहे. एल्गर भारताविरुद्धची ही कसोटी मालिाक संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. अशात त्याने ही मालिका कायम लक्षात राहील, अशीच खेळी बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावात केली.
एल्गरने 287 चेंडूत 185 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिका संघासाठी भारताविरुद्ध एकाद्या खेळाडूने केलेली ही सर्वात पाचवी मोठी खेळी ठरली. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज हाशिम आमला (Hashim Amla) याने भारताविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात मोठी 253* धावांची खेळी केली होती. यादीत दुसऱ्या क्रमांकावर एबी डिविलियर्स (AB Devilliers), तिसऱ्या क्रमांकावर जॅक कॅलिस (Jacques Kallis) आणि चौथ्या क्रमांकावर हर्शल गिब्स (Herschelle Gibbs) हे खेळाडू आहेत. 185 धावांची खेळी केल्यानंतर डीन एल्गर (Dean Elgar) दिग्गजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Dean Elgar scored the fifth best innings in South Africa’s history against India)
भारताविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वोत्तम खेळी करणारे खेळाडू (कसोटी, वनडे, टी-20)
253* – हाशिम आमला (6 फेब्रुवारी 2010, नागपूर)
217* – एबी डिविलियर्स (3 एप्रिल 2008, अहमदाबाद)
201* – जॅक कॅलिस (16 डिसेंबर 2010, सेंच्युरियन)
196 – हर्शल गिब्स (16 नोव्हेंबर 2001, पोर्ट एलिझाबेत)
185 – डीन एल्गर (28 डिसेंबर 2023, सेंच्युरियन)
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या –
‘टीम इंडियाला स्पष्टपणे त्याची उणीव भासतेय…’, गोलंदाजी प्रदर्शन पाहून दिग्गजाने काढली शमीची आठवण
AUS vs PAK: थेट कपाळावर दिला ॲाटोग्राफ! क्रिकेटर अन् चाहत्याचा भन्नाट फोटो Viral, पाहा कोण आहे तो